ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

पर्यावरण पूरक जीवनशैलीचा स्वीकार करा. ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांचे सौ.के.एस.के. महाविद्यालयामध्ये व्याख्यान संपन्न

पर्यावरण पूरक जीवनशैलीचा स्वीकार करा.
ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांचे
सौ.के.एस.के. महाविद्यालयामध्ये व्याख्यान संपन्न

बीड (प्रतिनिधी)ः   येथील सौ.के.एस.के.महाविद्यालय कर्मचारी कल्याण समिती तर्फे ज्येष्ठ पत्रकार तथा राजकिय विचारवंत डॉ.उदय निरगुडकर यांचे विकसीत भारत या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना त्यांनी सद्यस्थितीत भारत हा सर्वाधिक तरूणांचा देश विकसित होण्यास सुवर्णसंधी आहे. ब्रिटिशांच्या काळात भारताचा उत्पादन निर्यात दर पंचेवीस टक्के एवढा होता. भारत विकसित होण्यासाठी स्त्रियांचे योगदान महत्वाचे आहे.अनुशासन,देशप्रेम आणि सकारात्मक विचार महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकशाही प्रणालीत ज्या पध्दतीची प्रजा असते त्या पध्दतीचाच राजा असतो त्याचप्रमाणे यथा प्रजा तथा राजा या दृष्टीकोनातून देशाचा विकास होत असतो.विकसीत भारत बनवायचा असेल तर प्रात्यक्षिक शिक्षणाशिवाय पर्याय नाही.त्यामुळे शिक्षणात तंत्रज्ञानाची जोड अत्यंत आवश्यक आहे.भूतकाळातील,वर्तमानकाळातील आणि भविष्यकाळातील विकसीत भारताची संकल्पना आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यातून त्यांनी मांडली.महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राष्ट्रविकास निर्मितीसाठी ग्रामीण भागातील तरूण भविष्याच्या विकासासाठी बौध्दीक पातळीवर मोठ्या प्रमाणात संशोधन क्षेत्रात पुढे आलेले आहेत.त्यामुळे जगाच्या पातळीवर विकसित भारत होण्यासाठी तरूणांचा सहभाग मोठया प्रमाणात होत आहे.आज तरूण पर्यावरण पूरक जीवन शैलीचा स्वीकार करून प्रगतीकडे वाटचाल करत आहे.यासारखे मौलिक विचार त्यांनी मांडले.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर,पदव्युत्तर संचालक डॉ.सतिश माऊलगे, कमवि उपप्राचार्य डॉ.नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर,डॉ.सुधाकर गुट्टे, डॉ.विशंवाभर देशमाने, डॉ.विनायक चौधरी,डॉ.भीमराव राठोड तसेच बीड शहरातील पत्रकार,डॉक्टर,नागरीक आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!