ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

सहारा अनाथालयातील लेकिंची पाठवणी करताना बालग्राम गहिवरले..!

सहारा अनाथालयातील लेकिंची पाठवणी करताना बालग्राम गहिवरले..!

बालग्राम येथे द्वी-दशकपूर्तीसह विवाह सोहळा संपन्न ; विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सामाजिक कार्यकर्त्यांची हजेरी

गेवराई :बालग्रामच्या कन्या स्वाती आणि पायल या दोघींचा विवाह सोहळा रविवार दि.२१ रोजी दुपारी शुभ मुहूर्तावर मोठ्या थाटामाटात पार पडला. लेकिंना सासरी पाठवताना उपस्थित मान्यवर, बालग्राममधील बच्चे कंपनी व सर्वांनाच गहिवरून आले होते. आईबाबांच्या भूमिकेत असलेले प्रीती व संतोष गर्जे यांच्या तर अश्रूंचा अक्षरशः बांध फुटला. दरम्यान बालग्राम परिवाराची द्वी-दशकपूर्तीही साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

बालग्राम मधील कन्या स्वाती हिचा सूरजशी (खटाव,जि. सातारा) तर पायलचा शिवमशी (खटाव, जि. सातारा) विवाह संपन्न झाला. पुण्याच्या अंजली आनंद राईलकर, नीलकंठ देशमुख, C- EDGE चे कार्यकारी संचालक राहुल कुलकर्णी, माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडीत, गिताभाभी बाळराजे पवार यांच्यासह विविध भागातून विविध क्षेत्रातील मान्यवर वधुवर यांना आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. स्वाती ही संभाजीनगर येथील नीलिमा व निळकंठ देशमुख यांची मानसकन्या तर पायल ही पुण्याचे अंजली आनंद राईलकर यांची मानसकन्या होती. या दोघीही अल्पवयात बालग्राममध्ये आल्या आणि प्रीती व संतोष गर्जे यांच्या रूपाने त्यांना आईबाबांचे छत्र मिळाले. रविवार दि.२१ एप्रिल रोजी त्यांचा विवाह संपन्न झाला आणि सासरी निघाल्या तेव्हा अवघे बालग्राम गहिवरून गेले. उपस्थित प्रत्येकाचे हृदय भरून आले. या दोन्ही मुलींना ज्यांनी पोटच्या गोळ्याप्रमाणे जपले ते संतोष व प्रीती गर्जे या दोघांनी तर अक्षरशः हंबरडा फोडला. विवाह सोहळ्याच्या प्रसंगी प्रा. समाधान इंगळे प्रस्तुत नक्षत्र समूह संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान बालग्राम परिवाराचा द्वी-दशकपूर्ती सोहळा व अध्यात्म भवन या वास्तूचे संस्थार्पण सोहळाही पार पडला. या प्रसंगी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून संतोष गर्जे यांच्या कार्याला व बालग्राम परिवाराला शुभेच्छा दिल्या.

@चौकट-
जगरहाटीतला अनोखा विवाह सोहळा!
विवाह सोहळा म्हटलं की साधारणपणे नातेवाईकांचीच गर्दी अधिक असते आणि रक्ताचे नातेवाईक असून देखील रुसवे फुगवे, त्यातून होणारे वाद, पुढे होऊन काम कोणी करायचे म्हणून होणारी गैरव्यवस्था असे अनुभव सर्रास येतात. पण या जगरहाटीत बालग्राममधील हा आदर्श व अनोखा असा विवाह सोहळा अनुभवता आल्याचे समाधान उपस्थित मंडळींनी व्यक्त केले.
हा विवाह सोहळा ना रक्ताच्या नात्यातील होता ना कोणाच्या जाती-पातीचा होता. पण तरीही या सोहळ्यासाठी राज्यभरातील मान्यवर, तरुण मित्र उपस्थित होते. पैकी अनेकजण तर आपला अमूल्य वेळ काढून मागील तीन दिवसांपासून दाखल होऊन लग्नाच्या तयारीसाठी अहोरात्र झटत होते. अगदी स्वतःच्या घरातील लग्न असल्याप्रमाणे राबत होते. कसल्याही मानपानाची अपेक्षा न ठेवता पडेल ते काम हाती घेत होते. अर्थातच संतोष गर्जे यांनी कमावलेली ही प्रेमाची माणसं होती. एकूणच इतर लग्नांतील रुसवे फुगवे पाहता हा विवाह सोहळा अनेकांसाठी सुखद धक्का होता!

error: Content is protected !!