ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

बाळराजे पवारांचा राजकीय वारसदार आ.पवारांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या प्रचारार्थ मैदानात

बाळराजे पवारांचा राजकीय वारसदार आ.पवारांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या प्रचारार्थ मैदानात

शिवराज पवारांच्या कार्याचे पंकजाताई मुंडेन कडुन कौतुक

गेवराई:शहरातील पवार परीवारा बद्दल सर्व सामान्यात आदर आहे या घराण्यांने कधी जातीपातीचे,पक्षपातीचे राजकारण कधीही केलेले नाही म्हणून तर गेवराईच्या पाटील घराण्यात आज पर्यंत स्व.शिवाजीराव उर्फ भाऊसाहेब पवार,स्व.माधवराव पवार, तर गेली दहा वर्षांपासून बाळराजे पवारांच्या मार्गदर्शनाखाली आ.लक्ष्मण आण्णा पवार गेवराई विधानसभा मतदारसंघात विकासात्मक कामे मोठ्या प्रमाणावर करून कार्यसम्राट पदवी प्राप्त करून निपक्ष पणे काम केले आहे त्यामुळे मतदारसंघातील जनतेत आ.लक्ष्मण पवार यांनी आपले स्थान निर्माण केले आहे
काही महिन्या पासुन आ.लक्ष्मण पवार आजारी आहेत अशा परिस्थितीत शिवराज पवार यांनी स्वतःहून जबाबदारी खाद्यावर घेऊन ऑफिसला आलेल्या प्रत्येक व्यक्तीची भेट घेऊन अडी अडचण समजुन घेत आलेल्या नागरिकांचे काम आ.लक्ष्मण आण्णांच्या माध्यमातून मार्गी लावत आहेत तर शिवराज पवार मतदारसंघातील नागरिकांच्या थेट संपर्कात आहेत म्हणून येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत आ.लक्ष्मण आण्णा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथ मुडे यांच्यासाठी शिवराज पवार सक्रीय काम करत आहेत
विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांचे पुतणे व बाळराजे दादा पवार यांचे चिरंजीव युवा नेते शिवराज दादा पवार हे गेल्या काही वर्षांपासून बाळराजे पवार व आमदार लक्ष्मण पवार यांच्या सूचनेनुसार गेवराई मतदार संघातील सामाजिक राजकीय व विकासात्मक कार्यात स्वतःला झोकून देऊन दिवस रात्र काम करत आमदार लक्ष्मण पवार यांच्यासाठी राजकारणातील युवा वर्गाचे संघटन करत आज गेवराई तालुक्याच्या राजकारणात शिवरात पवार यांचे नाव आवर्जून घेतले जाते
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवराज बाळराजे पवार यांना स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे आज आमदार लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते शिवराज पवार महायुतीचे अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून गावागावात जाऊन आ.लक्ष्मण आण्णा पवार यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील विकास कामांवर लक्ष देऊन काम दर्जेदारच झाले पाहिजे यासाठी शिवराज पवार लक्ष घालत आहेत

error: Content is protected !!