ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

*आम्ही जातपातीचे नव्हे, शरदचंद्रजी पवारांच्या पुरोगामी विचारांचे पाईक – बजरंग बप्पा सोनवणे*

 

 

 

बीड / गेवराई

 

आम्ही शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पुरोगामी विचाराचे पाईक असलेले कार्यकर्ते आहोत याऊलट भाजपच्या उमेदवार व त्यांचे नेते जातीयवाद निर्माण करण्यातच धन्यता मानत आहेत. ते जातीपातीच्या राजकारणाचा आधार घेत आहेत असा आरोप बजरंग बप्पा सोनवणे यांनी केला. तसेच आम्हाला जाती-जातीत तेढ निर्माण करण्याची नाही. तर आम्हाला सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी गुण्या गोविंदाने राहण्यासाठी सर्वधर्म समभाव व प्रत्येकाला संविधानाने दिलेल्या अधिकाराने न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी काम करायचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले

 

बीड लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथे मतदारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री लोकनेते बदामराव पंडित, युवा नेते युध्दजीत पंडित, पूजाताई मोरे धम्मपाल कांडेकर, श्रीनिवास बेदरे, दत्ता कांबळे, कैलास राठोड, अण्णासाहेब राठोड, पंढरीनाथ लगड, अमोल सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

पुढे बजरंग सोनवणे म्हणाले की, आमचे नेते शरदचंद्र पवार हे या देशाचे नेते असून ते पूरोगामी विचारायचे आहेत. त्याच विचाराचे आम्ही पाईक आहोत. जातीयवाद पसरवून व जातीजातीत तेढ निर्माण करण्याची आम्हाला आवश्यकता नाही. या उलट भाजप जातीवादाचा आधार घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. त्यातून मतदान मिळण्यासाठी कुटील डाव रचित आहे. परंतु या जिल्ह्यातील जनता त्यांचा हा डाव कदापी यशस्वी होऊ देणार नाही. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!