ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

*माझ्या शेतात काय पिकते अन काय विकते ? याचा अनुभव पालकमंत्र्यांना आहे !* *बजरंग सोनवणे यांचे सडेतोड उत्तर* ————————————–

 

बीड / केज :- मी एक शेतकरी पुत्र असून मी माझ्या शेतात काय पिकवतो व काय विकतो ? याचा अनुभव विद्यमान पालकमंत्र्यांना आहे. कारण ते अनेक वेळा माझ्या सोबत माझ्या शेतात आलेले आहेत. असे खणखणीत प्रत्युत्तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी दिले.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे व इंडिया आघाडीचे उमेदवार

बजरंग बप्पा सोनवणे यांनी एका सभेत मी एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला असून त्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे मी जन्माने शेतकरी पुत्र आहे. आणि शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांच्या अडी अडचणी याची माहिती आहे. मी साखर कारखाना चालवीत असून त्यातून शेतकऱ्यांच्या उसाला मराठवाड्यात सर्वाधिक भाव देवून मी त्यांच्या कुटुंबाची व कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. म्हणून मी शेतकऱ्यांचा मित्र देखील आहे. असे एका सभेत बोलताना वक्तव्य करीत सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या भाजपच्या उमेदवार, पालकमंत्री आणि त्यांच्या नेत्यांना गरिब शेतकऱ्याचे सुख दुःख काय समजणार ? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या या प्रश्नाचा दाखला देत पालकमंत्री यांनी बजरंग बाप्पा हे शेतकरी पुत्र असले तरी त्यांच्या शेतात काय पिकते ? याचा शोध घ्यावे लागेल. असे म्हटले. त्याला उत्तर देताना बजरंग सोनवणे म्हणाले की, मी माझ्या शेतात मी काय पिकवतो ? आणि काय विकतो ? याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यमान पालकमंत्री यांना आहे. कारण आम्ही सोबत काम करीत असताना ते अनेक वेळा माझ्या शेतात आलेले आहेत. त्यामुळे मी कशाची शेती करतोय ? हे त्यांना चांगलेच माहीत आहे.

अशा शब्दात बजरंग बप्पा सोनवणे यांनी पालकमंत्र्यांना उत्तर दिले आहे.

error: Content is protected !!