ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

*धार्मिक स्थळांचे दर्शन, महापुरुषांना अभिवादन करीत बजरंग सोनवणेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज* ——————————–

 

बीड :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व इंडिया इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी सोमवारी दुपारी बीड शहरातील धार्मिक स्थळांचे दर्शन घेऊन व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत अत्यंत साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

 

बीड लोकसभा निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बीड शहरात दाखल होताच शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, अहिल्यादेवी होळकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करीत स्व. विनायकराव मेटे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. शहरातील प्रसिद्ध शहेनशाहवली दर्गा व इतर धार्मिक स्थळांना भेट देवून दर्शन घेतले. त्यानंतर कुठलेही शक्ती प्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासोबत खा रजनी पाटील , जीवनराव गोरे , मा आ सुनील धांडे , शिवसेना उबाठा गटाचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार , आ संदीप क्षीरसागर , मा आ बदामराव पंडित , मा आ पृथ्वीराज साठे , महेबूब शेख , मा आ सिराज देशमुख , मा आ सय्यद सलीम , बबनभाऊ गित्ते , यांची उपस्थिती होती

error: Content is protected !!