ब्रेकिंग न्युज
सत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवारविखेंच्या धनशक्तीसमोर लंकेंची जनशक्ती भारी – आ.भास्कर जाधव

पोकलेन मशिनमुळे पारंपरिक पद्धतीने क्रेनच्या सहाय्याने विहिर खोदकाम कामाला घरघर :-  डॉ.गणेश ढवळे

पोकलेन मशिनमुळे पारंपरिक पद्धतीने क्रेनच्या सहाय्याने विहिर खोदकाम कामाला घरघर :-  डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:- काळाच्या ओघात नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागला पोकलेन मशिनच्या मदतीने ३-४ दिवसात ४०-५० फुटांपर्यंत विहिर खोदाई होत असल्याने मशिनला मागणी वाढली असुन त्याच वेळी पारंपारिक पद्धतीने विहीर खोदाईसाठी ३-४ महिन्याचा कालावधी लागत असे.७०-८० च्या दशकात ४० ते ५० फुट  विहिर खोदाई करायची असेल तर बैलांच्या सहाय्याने शिकाळीच्या मदतीने दोन ते तीन वर्षांत काम व्हायचे.त्यानंतर २० वर्षांपासून क्रेन मथुरा आल्यानंतर हीच कामे ३-४ महिन्यांवर येऊन ठेपली असुन जानेवारी ते एप्रिल महिन्यात कामे करण्यात येतात.पारंपारीक पद्धतीने विहीर खोदाईसाठी वेळ आणि पैसाही जास्तीचा लागत असे.कमी कालावधीत आणि कमी पैशात मशिनरीने खोदाई होत असल्याने मशिनरीला जास्त मागणी असल्याने क्रेनच्या सहाय्याने विहीर खोदकामाला घरघर लागली आहे.

जिकिरीचे काम आणि धोकादायक तरीही मोबदला कमी:-  मजुर राजाभाऊ शेळके

विहिर खोदकाम करताना तळातले काम खुपच जिकिरीचे आणि धोकादायक असुन जीव मुठीत धरून काम करावे लागते.क्रेनच्या सहाय्याने मोठमोठे दगड वर काढताना कामगारांच्या अंगावर पडण्याची भिती असते.त्यामुळे फार लक्ष ठेवून काम करावे लागते.तरीही मेहनतीच्या मानाने मोबदला कमी असल्याचे १२ वर्षांपासून काम करणारे मजुर राजाभाऊ शेळके, बाबासाहेब जोगदंड, सर्जेराव शेळके,भारत शेळके,गणपत शेळके यांनी सांगितले.

पोकलेन मशिनमुळे क्रेनमालकांवर उपासमारीची वेळ:- क्रेन मालक हरिभाऊ जगताप

सध्या कमी वेळात आणि कमी खर्चात पोकलेन मशिनच्या सहाय्याने विहिरी खोदकाम मोठ्या प्रमाणावर होत असल्याने क्रेनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.बांधुन काढलेल्या विहिरीतील खोदकामातील आवाज घेतलेले दगड अथवा गाळ काढण्यासारखी तुरळक कामे मिळतात.त्यातही १५०० रूपये दिवसावर काम करताना एक मजुर आणि वाढलेले डिझेलचे भाव यामुळे जगणं अवघड झालं असल्याचे क्रेनचे चालक हरिभाऊ जगताप यांनी सांगितले.

ग्रामीण भागात अजुनही मदार पानाड्यावरच ; भुगर्भाचा शास्त्र शुद्ध पद्धतीने अभ्यासाची गरज :- डॉ.गणेश ढवळे

ग्रामीण भागात भुगर्भाचा अभ्यास शास्त्र शुद्ध पद्धतीने करण्याची गरज आहे.मात्र याचा विचार न करता आजही ग्रामीण भागात पाणाड्याला आमंत्रित केले जाते आणि भुगर्भातील पाण्याचा शोध घेतला जातो.पानाड्या हा शेतामधील आपट्याचे झाड,शमीचे झाड अथवा ज्या ठिकाणी ४ झाडांचा संगम आहे अशा ठिकाणी ओलसरपणा असल्याचे गृहीत धरून विहिर खोदली जाते.यामागे कोणतेही शास्त्र नसले तरी ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन असे प्रकार केले जातात. पाणी लागले तर पानाड्याचे नाव होते नाही लागले तर आपलं नशीब म्हणून शेतकरी त्याचा बोभाटा करत नाहीत. कोणत्या भागात विहीर घेतल्यानंतर पाणी लागणार आहे याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक आहे.पावसाळ्या नंतरच्या ३ महिन्यात भुगर्भात पाणी मुरण्याची प्रक्रिया थांबलेली असते परंतु या प्रक्रियेमुळे भुगर्भ खोदण्यासाठीची क्रिया सोपी असते म्हणून जानेवारी ते एप्रिल महिन्यात विहीर खोदकाम करण्यात येते .विहिर खोदण्यासाठी जमिन नैसर्गिक दृष्ट्या जमिनीमध्ये पाण्याचे संचयन करणारी,सांधे असणा-या दगडांमध्ये किंवा मुरूमाचा स्थर असणा-या दगडांमध्ये पाणी जास्त मुरते याठिकाणी विहिरी खोदण्याचे प्रमाण जास्त असुन विहीर खोदकाम करताना दगडाचा प्रकार महत्वाचा असुन मांज-या दगडांमध्ये सच्छिद्रता असते त्याठिकाणी पाण्याचे संचयन क्षेत्र जास्त असते.नदीपासुन काही अंतरावर,मऊ खडकांमध्येच खोदल्या जातात.मुरमाड खडक जर अधिक खोलवर असेल तर त्या भागात अधिकचे पाणी लागते.कठीण पाषाण खडकात पाणी लागत नाही.

error: Content is protected !!