ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

वनविभागातील आधिका-यांचा कारभार म्हणजे कुंपनच शेत खातंय; जिल्हाधिका-यांना तक्रार:- डॉ.गणेश ढवळे

वनविभागातील आधिका-यांचा कारभार म्हणजे कुंपनच शेत खातंय; जिल्हाधिका-यांना तक्रार:- डॉ.गणेश ढवळे
—-
बीड:- संपूर्ण मराठवाड्यात बीड जिल्ह्यात २.४ इतके कमी वनक्षेत्र असुन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ३३ टक्के वनक्षेत्र अपेक्षित आहे.वनक्षेत्र कमी असल्याने बीड जिल्ह्यात वारंवार दुष्काळाचे संकट येत आहे.वनक्षेत्र आणि हरितक्षेत्र वाढविण्यासाठी बीड जिल्ह्यातील वनविभाग ठोस पाऊल उचलण्याऐवजी वृक्षलागवडीत भ्रष्टाचार तसेच वृक्षतोडीमुळे जिल्ह्याचे वाळवंट होत असताना वनविभागातील आधिका-यांची कारवाईस टाळाटाळ आणि अनाधिकृत सा मिलकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष यामुळे बीड जिल्ह्यातील वनविभागाचा कारभार म्हणजे कुंपनच शेत खातंय अशी परिस्थिती असुन  बीड जिल्ह्यातील  वनविभागातील १०कोटी ८४ लाख रुपये गैरव्यवहार, अनाधिकृत वृक्षतोड आणि अनाधिकृत सा -मिल प्रकरणात कारवाईस टाळाटाळ तसेच वनविभागातील गैरव्यवहार प्रकरणात वनसंरक्षक सामाजिक वनीकरण औरंगाबाद अमितकुमार मिश्रा यांनी दोन वेळा स्मरणपत्र पाठवुन देखील चौकशी करून अहवाल देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल विभागीय वन अधिकारी (प्रादेशिक) बीड, विभागीय वन (सामाजिक वनीकरण) बीड तसेच जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्यावर प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे,शेख युनुस,शेख मुबीन,शेख मुस्ताक यांनी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे यांच्या मार्फत कार्यासिन अधिकारी महसूल व वनविभाग मंत्रालय, प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपुर, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) छत्रपती संभाजीनगर यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
वनविभागातील १० कोटी ८४ लाख रुपये गैरव्यवहार प्रकरणात वनसंरक्षक सामाजिक वनीकरण औरंगाबाद यांच्या आदेशाची अवमानना
—-
 बीड जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०१९-२० आणि सन २०२०-२१ वनविभागाच्या विविध कामांसाठी दिलेल्या १० कोटी ८४ लाख रुपये कामात गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या तक्रारीनंतर   वनसंरक्षक सामाजिक वनीकरण औरंगाबाद यांनी   विभागीय वन अधिकारी (प्रादेशिक) बीड आणि वन अधिकारी (सामाजिक) वनीकरण बीड यांना संबंधित प्रकरणात चौकशी करून कार्यवाही करून तक्रारदारास परस्पर कळवुन कार्यालयास अहवाल सादर करावा असा आदेश देत दोन वेळा  स्मरणपत्र देऊन सुद्धा अद्याप कोणतीही चौकशी व कारवाई न केल्याबद्दल संबंधित प्रकरणात जबाबदार आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी.
अनाधिकृत सा-मिल प्रकरणात कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
——
बीड जिल्ह्यात परवानाधारक सा मिलची संख्या व कार्यरत सा मिलची संख्या यात मोठी तफावत असुन अनाधिकृत सामिल वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण व्यवहारातुन कारवाईस टाळाटाळ होत असुन संबंधित प्रकरणात जबाबदार अधिका-यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.
बीड जिल्ह्यातील वृक्षतोडीकडे हफ्तेखोरीमुळे  कारवाईस टाळाटाळ
बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वृक्षतोडीच्या मोठ्या प्रमाणावर घटना घडत असुन वनविभागाकडे लेखी तक्रारी दिल्यानंतर सुद्धा कारवाई करण्यात येत नाही.बीड तालुक्यातील कानडीघाट गावातील अनाधिकृत वृक्षतोड प्रकरणात वनविभागातील अधिकारी यांनी स्थळपंचनामा केला मात्र संबंधित प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास जाणिवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे.यापुर्वीही  वृक्षतोड करणारी गाडी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडल्यानंतर ती सोडण्यासाठी लाच घेताना सगळे पथकच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याच्या घटना घडलेल्या आहेत.त्यामुळे संबंधित प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी.
error: Content is protected !!