ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ ऍड. प्रकाश आंबेडकर यांची   दिनांक 3 मे रोजी आंबेजोगाई मार्केट ग्राउंड वर होणार जाहीर सभा : लाखोच्या संख्येने उपस्थित रहा :- अशोक हिंगे पाटील

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ ऍड. प्रकाश आंबेडकर यांची
 दिनांक 3 मे रोजी आंबेजोगाई मार्केट ग्राउंड वर होणार जाहीर सभा : लाखोच्या संख्येने उपस्थित रहा :- अशोक हिंगे पाटील
 बीड प्रतिनिधी ;- बीड लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष एड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर हे बीड जिल्ह्यात  प्रचारासाठी येत असून  दिनांक 3 मे रोजी आंबे जोगाई येथील मार्केट ग्राउंड वर आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे तरी सभेस जिल्ह्यातील मतदार बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे  आव्हान अशोकराव हिंगे पाटील यांनी केले आहे
 लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात चालू असून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांचा प्रचार वेगात सुरू आहे अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून आता बीड जिल्ह्यत  ऍड. प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ  सभा घेणार आहेत आहेत बाळासाहेब आंबेडकर दि.2 मे रोजी बीड जिल्ह्यात मुक्कामी येत असून ते अनेक नेते कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन चर्चा करून संवाद साधणार आहेत त्यामुळे जिल्ह्यात अनेक घडामोडी घडवून प्रचारात रंगत येणार आहे दिनांक 3 मे रोजी आंबेजोगाई येथील मार्केट ग्राउंड वर संध्याकाळी 5:00 वाजता सभा सुरू होईल तरी जिल्ह्यातील सुज्ञ मतदार बंधू-भगिनींनी भव्य दिव्य होणाऱ्या जाहीर सभेस लाखोच्या  संख्येने  उपस्थित राहून विजयाचे शिल्पकार व्हावे असे आव्हान बीड लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोकराव हिंगे पाटील यांनी केले आहे
error: Content is protected !!