ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

 जि प नान्नज मुले शाळेचे आठवडे बाजारात पथनाट्यातून मतदानासाठी जनजागृती अभियान

जि प नान्नज मुले शाळेचे आठवडे बाजारात पथनाट्यातून मतदानासाठी जनजागृती अभियान

दिव्यांग मतदार बांधवांचे गृहभेटी घेउन मतदान करण्याचे केले आवाहन

जामखेड तालुक्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या मतदान जनजागृती निमित्त भव्य उपक्रम सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 37 अहमदनगर तथा उपविभागीय अधिकारी, कर्जत मा. श्री. नितिन पाटील साहेब, तहसिलदार जामखेड मा श्री गणेश माळी साहेब व जामखेड SVEEP टीमचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी जामखेड मा श्री बाळासाहेब धनवे साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये मतदान प्रक्रियेविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि आगामी निवडणुकामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदान जागृती अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नान्नजमुले , ता जामखेड या शाळेने आठवडे बाजारात पथनाट्याचे आयोजन केले होते.
पथनाट्या दरम्यान खुप संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पथनाट्यातून शाळेतील मुलांनी नाटिका सादर करीत मतदानविषयी नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देत मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. पथ नाट्य संपन्न झाल्यावर ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो ‘, ‘जनमनाची पुकार, मतदान आपला अधिकार’, ‘नवे वारे, नवी दिशा,मतदान आहे उद्याची आशा’, ‘वोट फॉर बेटर इंडिया’, ‘जागृत नागरिक होऊया, अभिमानाने मतदान करूया ‘ अशा घोषणा देत शाळेतील चिमुरड्यांनी नान्नज बाजारपेठ परिसर दुमदुमून सोडला होता. दिव्यांग व 85 पेक्षा जास्त वय असलेले व मतदान केंद्रावर जाऊ न शकणाऱ्या मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन असे मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सुविधेची माहिती देऊन मतदान कर्तव्य निभावण्याचे आवाहन केले.
या सर्व अभियान साठी नान्नज बीट चे शिक्षण विस्तार अधिकारी मा श्री सुनील जाधव साहेब, नान्नज केंद्राचे केंद्रप्रमुख मा श्री राम निकम साहेब आणि जामखेड तालुक्याची सर्व SVEEP टीम सुरेश मोहिते साहेब (तालुका समन्व्यक तथा केंद्रप्रमुख राजुरी ), केशवराज कोल्हे,गांगर्डे पी एम, प्रताप पवार, रवींद्र भापकर, सिद्धनाथ कचरे यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले. हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी नान्नजमुले शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोजकुमार कांबळे आणि सर्व उपाध्यापक श्री खरमाळे विठ्ठल, श्री सोमनाथ अनारसे, श्रीमती जयश्री दळवी आणि श्रीमती शिवाली डुचे यांनी प्रयत्न केले.

error: Content is protected !!