ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

जामखेड प्रतिनिधी;-जामखेड शहरातील तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आज रोजी सकाळी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपनेश्वर येथे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व शुभचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .मुलांच्या पुढिल शिक्षणा साठी शाळेच्या वतीने शुभेच्छा दिल्या . बालसंस्काराचे धडे देण्याचे काम गेले ५ वर्ष विद्यार्थ्यांना देत असताना अनेक प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त व्यक्तीमत्व विकास करण्याची संधी शाळेतील शिक्षकांनी मिळवून दिली . त्याचा फायदा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी होणार आहे.
जिल्हा परिषद शाळेत शिकत असताना स्पर्धेच्या युगात कुठेही कमी पडणार नाहीत असा विश्वास श्रीमती जया चौभारे यांनी व्यक्त करून मुलांना शुभेच्छा दिल्या .विद्यार्थांनी शाळेत मिळालेल्या विविध उपक्रमातून त्यांना शिक्षकांच्या मदतीने अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्याचे सांगितले . पुढिल शिक्षण घेत असताना निश्चित शाळेच्या उपक्रमांची आठवण होईल . शाळेचे नाव , गावाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू असा विश्वास मुलांनी व्यक्त केला . यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनराज पवार, मुख्याध्यापक बळीराम अवसरे, जया चौभारे, सुजाता राक्षे, प्रताप पवार, संजय आरेकर, शुभांगी साळुंखे, शितल कदम, रूपाली कांबळे, नीता तांबे आदी विद्यार्थी, अंगणवाडी सेविका व मदतनीस
पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

आजच्या घडीला जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढलेली असून तसेच स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले आहे .तालुक्यातील पालकांचा शिक्षण विभागाकडे व शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झालेला आहे . त्यासाठी आपल्या पाल्याचा प्रवेश मराठी माध्यम शाळेतच निश्चित करावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले.

error: Content is protected !!