ब्रेकिंग न्युज
स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळे

ओबीसी नेत्याला बॅनरवर डावलल्याने भुजबळ समर्थक ओबीसी मतदार पंकजाताई मुंढे यांना मतदानातून धडा शिकवणार – बापू गाडेकर 

ओबीसी नेत्याला बॅनरवर डावलल्याने भुजबळ समर्थक ओबीसी मतदार पंकजाताई मुंढे यांना मतदानातून धडा शिकवणार – बापू गाडेकर

गेवराई दि.२९ ( प्रतिनिधी ) :- बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीसाठी महायुतीकडून पंकजाताई मुंढे, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोकराव हिंगे यांच्यात तिरंगी लढत होत असताना या निवडणूकीत जातीपातीच्या राजकारणाला चांगलेच उधाण आले आहे. महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंढे यांनी आपल्याला मराठा समाजाची मते मिळणार नाहीत या भितीपोटी त्यांनी महाराष्ट्रात नव्हे तर देशपातळीवर ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांचा फोटो बॅनरवर न टाकण्याचा कुटील डाव आखल्याने भुजबळ समर्थक ओबीसी मतदार व कार्यकर्ते नाराज झाले असून ओबीसी नेत्याला बॅनरवर डावलल्याने भुजबळ समर्थक ओबीसी मतदार पंकजाताई मुंढे यांना मतदानातून धडा शिकवणार असल्याचे मत महात्मा फुले समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष तथा पत्रकार – बापू गाडेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार प्रवर्गातील मुळ ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेब हे जवळपास तीस ते पस्तीस वर्षांपासून संघर्ष करत आहेत. महाराष्ट्रातील मुळ ओबीसी समाजाला शिक्षण, नौकरी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी भुजबळ साहेबांनी सरकार दरबारी व न्यायालयात दाद मागून मोठा संघर्ष केलेला आहे. मराठा समाजाला देखील स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे अशी भुमिका देखील त्यांनी सरकार दरबारी मांडलेली आहे. परंतु आरक्षणाच्या या लढाईत मराठा समाजाने विनाकारण भुजबळ साहेबांना टार्गेट करून बदनाम करण्याचे काम केले आहे. मा.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून मुळ ओबीसी असलेल्या बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार प्रवर्गातील समाजावर अन्याय करण्याचे काम केल्यामुळे ओबीसी समाज खऱ्या अर्थाने संकटात सापडला होता. एकीकडे आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मुळ ओबीसी समाज दहशतीखाली वावरत होता. त्यावेळी स्वतः ला ओबीसी म्हणून घेणारा एकही नेता पुढे येऊन ओबीसी समाजाला आधार द्यायला तयार नव्हता. ओबीसी समाज भयभीत झालेला असताना त्यांच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी भुजबळ साहेबांनी ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावे घेतले. त्यावेळी ओबीसी चेहरा असलेल्या नेत्या पंकजाताई मुंढे कोणत्या बिळात जाऊन बसल्या होत्या ? असा प्रश्न आता ओबीसी समाजाला पडला आहे. बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार प्रवर्गातील मुळ ओबीसी समाजाला एकत्रित करून त्यांना धीर आणि आधार देण्यासाठी देशपातळीवर ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेब जेव्हा ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या माध्यमातून मैदानात उतरले तेव्हा त्यांना माजीमंत्री महादेव जानकर, आ.गोपीचंद पडळकर, प्रकाश अण्णा शेंडगे, शब्बीर अन्सारी, लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण हाके, प्रा.टी.पी.मुंढे, प्रा.पी.टी.चव्हाण, अँड.सुभाष राऊत यांच्यासह इतर नेते व कार्यकर्त्यांनी खंबीरपणे साथ दिली. परंतु माजीमंत्री पंकजाताई मुंढे यांनी मात्र संकटकाळात ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडण्याचे काम केले होते. आता त्यांना मतदानासाठी ओबीसी समाज हवा आहे. या निवडणूकीत जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मला एक संधी द्या अशी विनवणी त्या मतदारांना करत आहेत. मुळ ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ज्या भुजबळ साहेबांनी संघर्ष केला त्या नेत्याला बॅनरवर स्थान न देण्याचं काम पंकजाताई मुंढे यांनी केलं आहे. जर भुजबळ साहेबांचा फोटो बॅनरवर टाकला तर आपल्याला मराठा समाजाची मते मिळणार नाहीत अशी भिती त्यांना वाटत असावी म्हणूनच त्यांनी बॅनरवर फोटो टाकला नाही अशा चर्चा भुजबळ समर्थक ओबीसी मतदारांकडून ऐकावयास मिळत आहेत. ओबीसी नेते मा.ना.छगनरावजी भुजबळ यांना बॅनरवर डावलल्याने भुजबळ समर्थक ओबीसी कार्यकर्ते व मतदार नाराज झाल्याचे चित्र गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यात पहावयास मिळत असून महायुतीच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथ मुंढे यांना भुजबळ समर्थक ओबीसी मतदारांनी मतदान का करावे ? असा प्रश्न महात्मा फुले समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष – बापू गाडेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

error: Content is protected !!