ब्रेकिंग न्युज
घाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान 

आमचा बजरंग सोनवणेंना बिनशर्त पाठिंबा प्रा.सुरेश नवलेंनी भूमिका केली जाहीर

आमचा बजरंग सोनवणेंना बिनशर्त पाठिंबा
प्रा.सुरेश नवलेंनी भूमिका केली जाहीर
कार्यकर्त्यांच्या भावनांचा केला विचार
भाजपच्या दबावामुळे शिवसैनिकांचे राजकीय मातेरे झाले
शिवसेना मुख्यमंत्री चालवतात की भाजप?
कार्यकर्ता संवाद मेळाव्यात प्रा.सुरेश नवले आक्रमक
मोठ्या विश्वासाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आम्ही गेलो परंतू त्याचा काहीच उपयोग झाला नाही. भाजपच्या राजकीय दबावाला बळी पडून शिवसेना खिळखिळी होत असल्याचं दु:ख माझ्यासह शिवसैनिकाला न पचणारं आहे. उद्याच्या लोकसभा निवडणूकीत बीड मतदारसंघामध्ये आम्ही मविआचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा देत असून त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने कार्यकर्ते जिवाचे रान करतील असा विश्वास प्रा.सुरेश नवले यांनी बोलून दाखविला. मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेवूनच आपण हा निर्णय घेत असल्याचेही नवले यावेळी म्हणाले. बीड शहरातील सुर्या लॉन्स या ठिकाणी आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी बोलताना प्रा.सुरेश नवले पुढे म्हणाले, स्व.बाळासाहेब ठाकरे यांंच्या विचारांना पुढे नेण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत असा विश्वास आम्हाला होता परंतू काही दिवसांमध्ये आमचा भ्रमनिरास झाला. शिवसेनेमध्ये काम करत असताना पक्ष संघटन वाढविण्यासाठी जबाबदारी देण्याचे वचन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले होते परंतू त्यांनी फक्त पक्षामध्ये आम्हाला बसवून ठेवण्याचे काम केले. त्यामुळे आमच्यासह कार्यकर्त्यांचीही निराशा झाली. जो विचार ठेवून आम्ही शिवसेनेमध्ये आलोत त्याच विचारालो मुठमाती देण्याचं काम नेतृत्वाकडून होत आहे. भाजपने शिवसेनेला प्रत्येक वेळी खाली दाखविण्याचं काम सुरू केले आहे. त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा अंकुश मुख्यमंत्र्यांचा राहिलेला नाही. त्याचाच परिपाक म्हणून सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणूकीत शिवसेना पक्षाच्या अनेक विद्यमान खासदारांना देखील मुख्यमंत्री उमेदवारी मिळवून देवू शकले नाहीत. याचा प्रचंड रोष सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कायर्कर्त्यांमध्ये आहे. खर्‍या अर्थाने जनतेमध्ये जावून काम करणार्‍या लोकप्रतिनिधींनाच संधी मिळत नसल्याने त्यांचं राजकीय आयुष्यात मातेरे झाले. शिवसैनिकांची मोठी अपेक्षा होती की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराप्रमाणे शिवसेना चालेल परंतू तसे होताना दिसत नाही. सामान्य शिवसैनिकांना न्याय मिळत नाही. भारतीय जनता पार्टीच्या दबावाला झुगारून शिवसैनिकांना मुख्यमंत्री न्याय देतील अशी अपेक्षा होती परंतू तीही फोल ठरल्याचे  दिसत आहे. शिवसेना मुख्यमंत्री चालवतात की भाजप ? असा संभ्रम आता निर्माण झाला असून भाजप आपला पक्ष बळकट करत असताना शिवसेनेला मात्र खिळखिळी करत आहे. दुर्दैवाने भाजपच्या राजकीय दबावाला मुख्यमंत्री बळी पडलेले दिसत असल्याचंही यावेळी प्रा.नवले म्हणाले. मेळाव्याच्या सुरूवातीलाच काही कार्यकर्त्यांनी आक्रमपणे आपल्या भूमिका मांडल्या. ज्या ठिकाणी सन्मान होत नाही त्या ठिकाणी थांबायचे कशाला असाही सूर कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत होता. याच अनुषंगाने देखील विचार करत आपण मविआचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर करू असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. त्यामुळेच याच ठिकाणी प्रा.सुरेश नवले यांनी देखील कार्यकर्त्यांच्या  मताचा आदर करून सोनवणे यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी मोठ्या संख्येने प्रा.सुरेश नवले मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
(चौकट)
लोकसभेत ही अवस्था तर…
लोकसभेच्या निवडणूकीमध्ये ही अवस्था तर 288 जागेच्या विधानसभेच्या निवडणूकीत काय अवस्था राहील याची कल्पना जरी केली तरी शिवसेनेच्या भविष्याचा अंदाज येतो. शिवसेना चर्चेच्या तहामध्ये पूर्णत: हरलेली असून याचा फटका निश्चितच पक्षाला बसलेला असल्याचेही प्रा.नवले यावेळी म्हणाले.
(चौकट)
भाजपच्या भट्टीत…
जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी भाजपची स्वतंत्र साथ पकडली आहे तेव्हापासून  शिवसैनिकांची कुचंबना होत असल्याचे दिसून येत असून आजच्या लोकसभा निवडणूकीत सुध्दा अनेक ठिकाणी याचा प्रत्यय येत आहे. कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या ‘भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी’ हे बॅनर्स विशेष लक्ष वेधणारे ठरले. नेहमीच आपल्या वक्तृत्वाने सभा खिळवून ठेवणार्‍या प्रा.सुरेश नवले यांच्या या बॅनरचीही चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.
(चौकट)
तू भी एक सिकंदर है !
प्रा.सुरेश नवले यांचे भाषण म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक बळ देणारी पर्वणीच असते. भाषणा दरम्यान त्यांनी एक उर्दुमधील शेर म्हटला आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी देखील याला भरभरून दाद दिली.
“तजुर्बा कह रहा हूँ दोस्त
ये गम, ये डर, ये दर्द  सबकुछ तेरे अंदर है ।
खुद बनाये इस पिंजरे से निकल कर देख
तू भी एक सिकंदर है ।”
सध्या शिंदे सेनेच्या बाबतीत हा शेर तंतोतंत लागू पडल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याच्या प्रतिक्रिया देखील कार्यकर्त्यांमधून मेळाव्याच्या ठिकाणी व्यक्त होत होत्या.
error: Content is protected !!