ब्रेकिंग न्युज
घाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान 

आ.संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणेंसह बालाघाटावर

आ.संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणेंसह बालाघाटावर
शेतकर्‍याच्या पोराला मतदानारूपी आशिर्वादाचे आवाहन
बीड दि.२९ (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील गावांमध्ये जाऊन आ.संदीप क्षीरसागर व बजरंग सोनवणे यांनी लोकांच्या प्रत्यक्ष भेटीगेटी घेत शेतकर्‍याच्या पोराला मतदानरुपी आशिर्वाद द्या असे आवाहन करत प्रचार दौरा केला‌.
             सोमवार (दि.२९) रोजी बीड तालुक्यातील वानगाव, गोगलवाडी, रौळसगाव, अंजनवती, वडवाडी/बोरखेड, महाजनवाडी, लोणी घाट, गोलंग्री, कानडी घाट, सुलतानपूर, घारगाव या बालाघाटावरील गावांमध्ये जाऊन गावकर्‍यांशी थेट संवाद साधत आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रचार दौरा केला. यावेळी इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हेही  सोबत होते. आ.क्षीरसागर व बजरंग सोनवणे यांनी, गावकर्‍यांना एकदा तुमच्यातल्याच एका शेतकर्‍याच्या पोराला मतदानरूपी आशिर्वाद द्या आणि आपले प्रश्न जाणणारा आणि मांडणारा खासदार तुमच्याच आशिर्वादाने बीड जिल्ह्याला द्या असे नम्र आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह इंडिया आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ.संदीप क्षीरसागर हे बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी दररोज बीड मतदारसंघासह जिल्ह्यातील अनेक भागात फिरत आहेत. दरम्यान सर्वसामान्य लोकांकडून बजरंग सोनवणे यांना प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळत चालला आहे.
error: Content is protected !!