ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

सौ.के.एस.के.महाविद्यालयात  मानवी साखळी तयार करून  मतदान जनजागृती

सौ.के.एस.के.महाविद्यालयात  मानवी साखळी तयार करून
मतदान जनजागृती
बीड(प्रतिनिधी)ः येथील सौै.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर व कमवि उपप्राचार्य डॉ.नारायण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व गटशिक्षणाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून व विद्यार्थ्यांना मतदान शपथ देऊन मतदार जनजागृती करण्यात आली.
लोकसभा निवडणूक 2024 साठी निवडणूक विभागाच्या वतीने विविध माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सौ.के.एस.के.महाविद्यालयामध्ये महाविद्यालया समोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूने विद्यार्थी , विद्यार्थिंनींची व कर्मचार्‍यांची मानवी साखळी तयार करून मतदान जनजागृती करण्यात आली.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा.अनिल जाधव व डॉ.पांडूरंग सुतार यांनी परिश्रम घेतले.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सतीष माऊलगे, कमवि उपप्राचार्य डॉ.नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, क्रीडा संचालक डॉ.भागचंद सानप,डॉ.सुधाकर गुट्टे, कार्यालयीन अधिक्षक  डॉ.विश्वांभर देशमाने तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!