ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

शिक्षकांविरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी

शिक्षकांविरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी

स्त्रीलंपट गुंड, पहिली पत्नी हयात असताना दुसरी पत्नी करणाऱ्या शिक्षकाला बडतर्फ करून गुन्हा दाखल करण्याची मागणी

जामखेड :- स्त्रीलंपट, गुंड प्रवृतीचा, पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह करणारा विजय सुभाष जाधव यांस सेवेतून बडतर्फ करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांची पत्नी सौं. मेघना जाधव यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. अ. नगर यांच्या कडे तक्रारीद्वारे पुराव्यासह केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, श्री. विजय सुभाष जाधव प्राथमिक शिक्षक जि. प. शाळा मोहा ता. जामखेड यांचे माझ्या बरोबर ( सौं. मेघना विजय जाधव ) 20/05/2006 रोजी लग्न झालेले असून आम्हाला तनुश्री विजय जाधव ही मुलगी असून ती सद्या बारावीत शिकत आहे. गेली अनेक वर्षापासून माझे पती मला व माझ्या मुलीचा सांभाळ करत नाही. आमच्या लग्नाला अवघे वर्षही झाले नाही तर विजय सुभाष जाधव यांनी एका शिक्षिका या स्त्रीला घरात घेऊन आला, माझा संस्कार उध्वस्त करण्यात तिचा देखील सहभाग आहे.
विजय सुभाष जाधव यांचा माझ्याशी घटस्फोट घेतलेला नाही तरी देखील एका शिक्षिका बरोबर दुसरे लग्न केले आहे तसेच त्यांना 4 ते 5 वर्षाची मुलगी आहे. या संदर्भात माझे वडील व्ही. के. गायकवाड रा. देवीइद्रायणी सोसायची इ 404 तळवडे 411062 जि. पुणे यांनी अनेक वेळा तक्रार केली आहे तसेच माहितीअधिकार पत्रान द्वारे वारंवार अर्ज करून माहिती मागितली होती परंतु त्यांना सतत निराशाजनक माहिती देत गेले कारण विजय सुभाष जाधवला कोणीतरी वरदहस्त लाभल्यामुळे हा प्रकार घडत आहे.
पहिली पत्ती हयात असताना एका शिक्षिका बरोबर विजय सुभाष जाधव यांनी दुसरा विवाह केला असून त्यांना चार ते पाच वर्षाची मुलगी देखील आहे. दि.12/04/2022 रोजी माझी बदनामी केल्यामुळे तसेच पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न केल्यामुळे विजय सुभाष जाधव यांच्या विरोधात देहूरोड पोलीस स्टेशन येथे भा. द. वि कलम 494/500 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे.
शासन नियमानुसार पहिली पत्नीचा घटस्फोट झाल्याशिवाय दुसरे लग्न करता येत नाही तरीही विजय जाधव यांनी दुसरे लग्न करून त्यांना आपत्यही झाले आहे. त्यामुळे माझ्यावर ( मेघना विजय जाधव ) अन्याय झाला असून त्यांनी पत्नी व मुलीचा सांभाळ करत नाही. त्यांचबरोबर त्यांनी कधीही तनुश्री विजय जाधव ही त्यांची मुलगी असून देखील तिला कधी विचारणा केली नाही व तिच्या शिक्षणाबाबत कधीही कुठल्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारली नाही. विजय सुभाष जाधव हे स्त्रीलंपट असून गुंड प्रवृत्तीचे आहेत. पहिली पत्नी हयात असून एक शिक्षिका तिच्याबरोबर त्यांनी अनैतिक संबंध ठेवले.
विजय सुभाष जाधव हे शिक्षक सेवक कालावधीमध्ये जिल्हा परिषद शाळा कोसेगव्हाण निधी कार्यरत असताना अनाधिकृत गैरहजर राहून एका शिक्षिकेला हिला भेटायला जात असे. व न्यायालयात देखील हजर राहून प्रशासनाची दिशाभूल करत असे त्यांना मा. मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. अहमदनगर दि.21/07/2011 रोजी जिल्हा परिषद सेवेतून बडतर्फ करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा यापूर्वी यांच्यावर अनेक प्रशासकीय कारवाही झालेली आहे.
तसेच सद्यस्थितीत तनुश्री विजय जाधव ही बारावी सायन्सला शिकत आहे तिच्या कास्टव्हॅलीडीटी साठी तिचे वडील विजय सुभाष जाधव यांचे कागदपत्रे आवशक्यता असून देखील तनुश्रीने कॉल करून पेपर्सची मागणी केली परंतु त्याने दिली नाही. विजय सुभाष जाधव व त्याचा भाऊ संजय सुभाष जाधव हे दहावीपर्यत निमगाव म्हाळुंगे शिऊरफाटा येथे आश्रम शाळेत शिकत होते याची माहिती मिळाली तेव्हा येथील मुख्याध्यापिका काळे मॅडम यांना मी मेघना विजय जाधवची पत्नी असे संपर्क करून दहावीचे दाखलेची मागणी केली तर त्यांनी सहकार्य न करत दाखले देण्यात विजय सुभाष जाधव यांनी विरोध केला आहे असे मला सांगण्यात आले तुम्ही थर्डपर्सन आहेत तुम्हाला दाखले देऊ शकत नाही शिक्षिका असूनही एका विद्यार्थिनीच्या शिक्षणास अडथळे निर्माण करणारे शिक्षक सुद्धा गुन्ह्यात पात्र आहेत. माझ्याआयुष्याशी खेळणारे विजय सुभाष जाधव व एक शिक्षिका हे दोन्हीही गुन्ह्यात पात्र आहे. असे निवेदनात म्हंटले आहे.

error: Content is protected !!