ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

तहसीलदार खोमणे साहेब थोडी जनाची नाही तर मनाची तरी राखा व निराधारांची हेडसान थांबवा – राधाकिसन मोटे

तहसीलदार खोमणे साहेब थोडी जनाची नाही तर मनाची तरी राखा व निराधारांची हेडसान थांबवा – राधाकिसन मोटे

गेवराई प्रतिनिधी;- सध्या उन्हाचा पारा जसा जसा चढत आहेत तसाच गेवराई तहसील मधील काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचाही रेट वाढत असल्याचे बोलले जात असून तहसील मधील काही कर्मचारी मलाई साठी निराधारांना हयातनामा देत नसुन वेठीस धरण्याचे काम करत आहेत. त्यांच्यावर तहसीलदार संदीप खोमणे यांनी वेळेत अंकुश लावावा अशी मागणी समाजसेवक राधाकिसन मोठे यांनी केली आहे.
गोरगरीब लाभार्थी यांना उन्हातानात भटकंती करावी लागत आहे. सध्या चैत्र महिना व खूप कडक ऊन पडत असल्यामुळे निराधारणांना तहसील मधील कर्मचारी विनाकारण वेठीस धरत आहेत. मंजुरी पत्र व उत्पन्नाचे प्रमाणपत्र दरवर्षी द्यावे लागत आहेत एक वेळेस दिलेले कागदपत्रे दरवर्षी द्यायची काय गरज ? त्यांच्या संगणकावर दिसत का नाहीत ? निराधार हे कोणाचे तरी आई-वडील बहिण-भाऊ चुलते-चुलती नाहीत का ? हे राज्यकर्त्यांना व कर्मचाऱ्यांना दिसत नाही का ? मतदान करताना कसा पुळका लावता त्यांना हातांना धरून मतदान करायला नेतात मग हयातनामा देण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये येऊन त्यांना मदत का करत नाहीत. ही निराधारांची हेळसांड थांबवा तसेच पैशाची मागणी करणाऱ्या व कामचुकारपणा करणाऱ्या तहसीलमधील कर्मचाऱ्यांवर तहसीलदार खोमणे यांनी योग्य ती कारवाई करून निराधाराधारांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी समाजसेवक राधाकिसन मोठे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

चौकट
तहसील कार्यालयात पैशाची मागणी करणारे कोण ते अधिकारी

गेवराई तहसील मध्ये हयातनामा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र व मंजुरी पत्र देण्यासाठी गोरगरीब नागरिकांकडून सर्रास पैशाची मागणी होत आहे. हे पैसे मागणारे कर्मचारी कोण याचा तहसीलदार खोमणे यांनी तपास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.

चौकट

भू-माफिया व वाळू माफिया यांना अभय तर सर्वसामान्यांची आडवनूक

गेवराई शहरांमध्ये शासकीय जागेवर भू-माफिया यांनी अतिक्रमण करून त्या जागेवर प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू केला आहे तर बॉण्डवर खरेदीखत ही सुरू असल्याचे बोलले जात असून तालुक्यात एकही वाळूचा सध्या तरी ठेका सुरू नाही तरीही रात्रभर हायवाच्या साह्याने वाळू वाहतूक तर दिवसभर ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू वाहतूक होत आहे याकडे दुर्लक्ष का ? व गोरगरीब नागरिकांची लहान-सहान कामासाठी आडवनूक करून त्यांना मानसिक त्रास देण्याचे काम सुरू आहे. याकडे सर्वांचे दुर्लक्ष होताना दिसत असले तरी जिल्हाधिकारी मॅडम यांनी याकडे लक्ष घालून यातील दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

error: Content is protected !!