ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पंकजाताईंच्या विजयासाठी डॉ. योगेश क्षीरसागर यांचा विजय संकल्प मेळावा

पंकजाताईंच्या विजयासाठी डॉ. योगेश क्षीरसागर यांचा विजय संकल्प मेळावा
बीड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – डॉ.योगेश क्षीरसागर
बीड प्रतिनिधी;-दि.०२महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या विजयासाठी आयोजित विजयी संकल्प मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले आहे.
बीडमध्ये पंकजाताई मुंडे यांना लोकसभेत विजयी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे आणि लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. शुक्रवार (दि.०३) रोजी सकाळी १० वाजता शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
बीड लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपच्या पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी मिळाली असून त्यांच्या विजयासाठी डॉ. योगेश क्षीरसागर आणि डॉ.सारिकाताई क्षीरसागर हे दाम्पत्य दिवस रात्र बीड मतदार संघात कॉर्नर बैठका घेत आहेत.  पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून डॉ. योगेश क्षीरसागर हे त्यांच्या प्रचारासाठी सरसावले आहेत. या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांना बीड मतदार संघातून जास्तीत जास्त मती मिळून ऐतिहासिक विजयासाठी शहरातील प्रत्येक वार्डात गावागावात जाऊन कॉर्नर बैठका घेऊन नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.
पंकजाताईंच्या विजयासाठी डॉ. योगेश क्षीरसागर यांच्याकडून विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे आणि लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  डॉ.योगेश क्षीरसागर आणि डॉ.सारिकाताई क्षीरसागर हे दोघेही मतदार संघात काम करत असताना प्रत्येक समाजातील लोकांच्या सुखा दुःखात सहभागी होत असतात. त्यामुळे बीड मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा जनसमुदाय आहे. त्यामुळे या मेळाव्यातून डॉ.योगेश क्षीरसागर हे बीड मतदारसंघातून आपली ताकद दाखवून देतील. आणि पंकजाताई यांना बीड मतदार संघातून मोठ्या प्रमाणात लीड मिळवून देतील. या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.
error: Content is protected !!