ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

मादळमोही कोळगाव सर्कलमध्ये बजरंग सोनवणे यांच्या दौर्‍यामुळे मतदारांमध्ये उत्साह

मादळमोही कोळगाव सर्कलमध्ये बजरंग सोनवणे यांच्या दौर्‍यामुळे मतदारांमध्ये उत्साह
उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील वातावरण बजरंगी
मादळमोही । प्रतिनिधी;- महाआघाडी घटकपक्षांचा बीड लोकसभा उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी गेवराई विधानसभा मतदार संघातील मादळमोही, चकलांबा कोळगाव आदी सर्कलमधील गावांना दि.०१ मे रोजी दौर्‍यातील भेटीमुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या दौर्‍याला ठिकठिकाणी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या दौर्‍यात त्यांनी विविध ठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार व इंडिया आघाडी चे उमेदवार बजरंग सोनवणे उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. दरम्यान या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील वातावरण बजरंगमय झाले आहे.
  बीड लोकसभा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार व इंडिया आघाडी चे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी  गेवराई विधानसभा मतदार संघात तागडगाव गोविंदवाडी मनेरवाडी मानमोडी सिंदखेड, चिखली, वडगाव, सुशी कवडगाव, बंगाली पिपळा, साठेवाडी, कोळगाव, काजळा तांदळा, सैदापूर शेकटा मादळमोही कुंभारवाडी वंजारवाडी भंडगवाडी आदी गावांमध्ये झंझावाती दौरा दि.०१ मे २०२४ रोजी करून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या दरम्यान या दौर्‍यातही मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की, विद्यमान सरकारने नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, शेतमजुर आणि सर्वसामान्य जनतेला फक्त आश्‍वासनांचे गाजर दाखविले.  बीड जिल्ह्याने मुंडे कुटुंबियांना निवडून दिले आहेत. पंधरा वर्षे लोकसभेमध्ये आहेत पण जिल्ह्यामध्ये विकासाचा पत्ता नाही. बीडला रेल्वे  आली नाही. शेतकऱ्यांच्या शेतीच्या सिंचनाचा प्रश्न आणखीनही सोडला नाही. जिल्ह्यातील तरुण, बेरोजगार झाले आहेत. खासदार प्रितमताई आणि पंकजाताई मुंडे यांनी जनतेला विकासापासून वंचित ठेवले आहे. बहुजन दलित समाजाचे प्रश्न असो , किंवा धनगर आरक्षणाचा प्रश्न असो किंवा मुस्लिम मराठा आरक्षणाचा प्रश्न या विद्यमान सरकारने सोडला नसून जिल्ह्याच्या जबाबदार नेत्या पंकजाताई आणि पालकमंत्री धनंजय मुंडे ब्र शब्द काढत नाही असे शेतकरी कन्या पुजाताई मोरे यांनी सांगितले. दरम्यान बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचा बहुरंगीपणा हा फक्त बीड जिल्ह्यालाच माहीत आहे असे नाही तर अख्या महाराष्ट्राला माहित आहे. कृषी मंत्री म्हणून सन-२०२० चा पीक विमा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आला नाही. यावरून पालकमंत्री किती बहुरंगी आहेत, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही असा पलटवार बजरंग सोनवणे यांनी केला. तसेच कोळगाव येथील श्रीराम देवाच्या मंदिरात बोलताना सांगितले की, या परिसरातील लोकप्रतिनिधी आणि नेते म्हणतात की, गोदावरी नदी चे पाणी सिंदफणा नदी सिंचन प्रकल्प करु असे सांगत आहे. पण दहा पंधरा वर्षांपासून सत्तेत असणारे नेत्यांनी काम का केले नाही असा सवाल आहे. यासाठी हे सिंचन प्रकल्प आम्ही पूर्ण करू आणि येथील विकास कामांसाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. येणार्‍या काळातही त्यांच्या खोट्या प्रलोभनाला बळी न पडता शेतकर्‍यांसह सर्वसामान्य जनतेचा पक्ष असलेल्या शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे मतांची ताकद उभी करा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत माजी मंत्री बदामराव पंडित राष्ट्रवादी किसान आघाडीच्या पूजा ताई मोरे काँग्रेस तालुका अध्यक्ष महेश बेद्रे, माजी सभापती पंढरीनाथ लगड, व्हा. चेअरमन विष्णू जगदाळे, अविनाश गवळी, अनु जिजा लोंढे, असाराम करांडे, सखाराम गाडे, अजय दाभाडे, रोहित पंडित, बाळासाहेब सिंनगारे, सरपंच माऊली नवले किंचक नवले यासह पंचक्रोशीतील हजारो नागरिक युवक उपस्थित होते.
error: Content is protected !!