ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पंकजाताई मुंडेंच्या प्रचारासाठी आ.मुंदडा डोअर टू डोअर मतदारांपर्यंत

पंकजाताई मुंडेंच्या प्रचारासाठी आ.मुंदडा डोअर टू डोअर मतदारांपर्यंत

अंबाजोगाई शहर काढले पिंजून; शहरातील विविध प्रभागात नागरिकांशी संवाद

प्रचार फेरी काढून प्रचार पत्रकांचे केले वितरण; पंकजाताईंना मतदारांचा वाढता कौल

अंबाजोगाई । दि. 02;-भाजपा-महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी केज विधानसभेच्या भाजपा आ..नमिताताई मुंदडा या अंबाजोगाई शहरात डोअर टू डोअर मतदारांपर्यंत पोहचल्या. दोन दिवस शहरातील विविध प्रभागात जावून पंकजाताईंच्या प्रचारार्थ त्यांनी पाॅम्लेट मतदारांना  वितरित केले.  पंकजाताई मुंडे या खंबीर नेतृत्वाला बहुमताने विजयी करून लोकसभेत पाठवा आणि देशाच्या विकासात आपले योगदान द्या असे आवाहनही यावेळी आ.नमिताताई मुंदडा यांनी अंबाजोगाई शहरातील नागरिकांना केले.

पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ भाजपा आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांनी अंबाजोगाई शहरातील गांधीनगर, गवळीपुरा, मिलिंद नगर,मोची गल्ली, पंचशील नगर,खुरेशी गल्ली, कैकाड गल्ली सदर बाजार येथे प्रचार फेरी काढून प्रचार पत्रकांचे वितरण केले. तसेच शहरातील गुरूवार पेठ, खंडोबा मंदिर परिसर,मदिना चौक, पोस्ट ऑफिस रोड,गुरूवार पेठ,दुर्गा माता रोड गांधीनगर,ढोर गल्ली या परिसरात कार्यकर्त्यांसमवेत प्रचार फेरी काढून प्रचार पत्रके वितरित करत आ.नमितताईंनी मतदारांशी संवाद साधला.

स्थिर आणि खंबीर मोदी सरकारच्या काळात देश वेगाने प्रगती करत असून महासत्ता होण्याकडे आपली वाटचाल सुरु आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला आहे. लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण देण्याचे सूतोवाच मोदी सरकारने केले आहे. उज्ज्वला योजनेतून कोट्यवधी महिलांना सिलेंडर देण्यात आले आहेत. तर, लाखो महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. त्यासोबतच शेतकरी, उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी असे सर्वच क्षेत्रातील नागरिकांच्या दीर्घकालीन उज्वल भविष्यासाठी मोदी सरकारने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. ही सर्व चांगली स्थिती असून आगामी काळात देशाचा विकासाचा चढता आलेख कायम रहावा यासाठी तसेच बीड जिल्ह्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मतदार म्हणून आपण सर्वांनी पंकजाताई मुंडे यांना विजयी करावे. पालकमंत्री असताना पंकजाताईंनी अनेक योजना जिल्ह्यात राबवल्या. विकासकामे पूर्ण केली. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कायम पुढाकार घेणार्‍या पंकजाताई मुंडे यांना या निवडणूकीत बहुमत द्यावे असे आवाहन आ.नमिताताई मुंदडा यांनी याप्रसंगी केले.यावेळी त्यांच्या समवेत शहरातील महायुतीचे पदाधिकारी , कार्यकर्ते व इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!