ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

लिंबागणेश येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

लिंबागणेश येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
—-
लिंबागणेश:-  बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे दि.३० मंगळवार रोजी राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सरपंच बालासाहेब जाधव यांच्या हस्ते सकाळी पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. तथागत भगवान गौतम बुद्ध,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष अरूण निर्मळ यांनी उपाध्यक्ष अमोल वक्ते यांनी सुत्रसंचलन केले.सोनु निर्मळ यांनी आभारप्रदर्शन केले.या कार्यक्रमात महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी शिका संघटित व्हा, संघर्ष करा हा मुलमंत्र देऊन देशातील उपेक्षित समुहातील समाज बांधवांना आपल्या हक्क व अधिकारासाठी आवाज उठवण्याची व लढा उभारण्याची ताकद निर्माण करून देण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्याचे प्रतिपादन सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ यांनी केले.
सायंकाळी फुलांनी आणि निळ्या ध्वजांनी सजवलेल्या जीप मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर भालचंद्र माध्यमिक विद्यालय पासुन सुरूवात करत संपूर्ण गावातुन संगीत वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.भिमगीतांवर वाद्यांच्या तालावर तरूणाईने ठेका धरला भिमसैनिक आबालवृद्ध महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जयंती निमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबीर तसेच व्याख्यान, गायनाच्या विविध कार्यक्रमांचे ३ दिवसीय आयोजन करण्यात आले आहे.जयंती यशस्वीतेसाठी जितेंद्र निर्मळ, प्रा.लेहनाजी गायकवाड, सुरेश निर्मळ,अमोल निर्मळ,रिंकु निर्मळ, बालाजी निर्मळ तुकाराम गायकवाड,नाना निर्मळ स्वप्निल वक्ते,बाळु निर्मळ, कैलास गायकवाड, पप्पु आवसरे,पोपट निर्मळ,बापु थोरात, पप्पु निर्मळ, सुमित निर्मळ, स्वप्निल निर्मळ, प्रकाश निर्मळ, ज्ञानोबा निर्मळ,सनी जाधव, रणजित साळुंके आदिंनी परीश्रम घेतले. मिरवणूक दरम्यान नेकनुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे,लिंबागणेश पोलिस चौकीचे जमादार बाबासाहेब डोंगरे पोलिस बंदोबस्तासाठी उपस्थित होते.

error: Content is protected !!