ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

संत तुकाराम मंदिर तळेगाव येथे निवासी संस्कार शिबिराचे आयोजन

संत तुकाराम मंदिर तळेगाव येथे निवासी संस्कार शिबिराचे आयोजन

२१ दिवसांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार
बीड (प्रतिनिधी): बीड शहरापासून जवळ तळेगाव काकडहिरा दरम्यान असणाऱ्या जगद्गुरु संत श्री तुकोबाराय सेवापीठ तथा संत तुकाराम महाराज मंदिर येथे यावर्षी निवासी वारकरी संस्कार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दिनांक ५ मे २०२४ ते २५ मे २०२४ या कालावधीमध्ये इयत्ता पाचवी ते आठवी या वर्गातील म्हणजे वय वर्ष  ११ ते १४ या वयोगटातील एकूण ४० विद्यार्थ्यांना या संस्कार शिबिरासाठी प्रवेश दिला जाणार आहे. शिबीरामध्ये सकाळी व्यायाम, स्नान, स्तवन, ज्ञानेश्वरी अध्ययन, तुकोबारायांच्या गाथेचा अभ्यास, शब्द भेंड्या, शंका समाधान, प्रवचनातून प्रबोधन, हरिपाठ, मैदानी खेळ या पद्धतीने वारकरी सांप्रदायिक संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जाणार आहेत. दि. ५ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता दैनिक झुंजारनेताचे संपादक अजित वरपे, दैनिक प्रजापत्राचे संपादक सुनील क्षीरसागर, प्राचार्य जे.एम. पैठणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या संस्कार शिबिराचे उद्घाटन होणार आहे. विद्यार्थ्यांना संत साहित्याची गोडी लागावी, विद्यार्थ्यांची मोबाईल पासून सुटका व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड, अहंगंड, भयगंड जाऊन आत्मविश्वास निर्माण करणे, सामूहिक जीवन जगण्याची गोडी लावणे, नाम चिंतनाची सवय लावणे, मानसिक, शारीरिक, भावनिक, बौद्धिक, धार्मिक, परमार्थिक व आध्यात्मिक क्षमतांचा विकास करणे असे भव्य उद्दिष्ट ठेवून सदरील प्रशिक्षणाचे आयोजन तुकोबाराय किंकर ह.भ.प. प्राचार्य परशुराम महाराज मराडे यांनी केलेले आहे. या प्रशिक्षणा दरम्यान श्रीकृष्ण उबाळे, आचार्य सुधाकर शिंदे, प्रशांत पवळ, त्रिंबक मातकर, डी.जी. तांदळे, आर.एल. कदम, संतोष डोंगरे, पांडुरंग आबा पवळ, भाऊसाहेब धांडे, माधव डाके, श्री गवते यांची संत चरित्रावर कथा सांगणार आहेत. तसेच गायनकल राजाराम घोलप, दिगंबर पांडुळे पाहणार आहेत तर वादनकल मच्छिन्द्र गोरे हे पाहणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या वारकरी संस्कार शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जगद्गुरु तुकोबाराय सेवापीठातर्फे करण्यात येत आहे.
error: Content is protected !!