ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

चारा दरात वाढ जनावरांना बाजाराची वाट पाण्याचीही टंचाई कडब्याचा दर तीन हजारांवर

चारा दरात वाढ जनावरांना बाजाराची वाट पाण्याचीही टंचाई कडब्याचा दर तीन हजारांवर

शेवगाव ;- सध्या उन्हाबरोबर वाढत्या महागाईच्या झळा शेतकऱ्यांना बसत आहेत जनावरांना लागणारा हिरवा चारा महाग झाला आहे कडब्याचा दर तीन हजारांपुढे गेल्याने शेतकऱ्यांकडून जनावरांना बाजाराची वाट दाखवली आहे
जनावरांना पोषक चारा म्हणून कडब्याला मागणी असते ज्यांच्याकडे बैल गायी म्हशी आहेत असे शेतकरी ज्वारीचा पेरा करतात अनेक शेतकरी खुरपणी काढणी कडबा बांधणी या भानगडीत न पडता हरभरा सोयाबीनची पेरणी करतात ज्वारीचा पेरा कमी क्षेत्रात असल्याने यदा कडबा भाव खात आहे दुभत्या जनावरांसाठी कडबा आवश्यक असल्याने त्याच्या मागणीत वाढ झाली आहे शेवगाव तालुक्यातील बोधेगाव आणि परिसरातील साठवण तलाव हे लघु आणि मध्यम स्वरुपाचे आहेत त्या सर्व तलावांनी तळ गाठला आहे त्यामुळे या साठवण तलावांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना चारा पिकांची लागवड शक्य झाली नाही बाजारात पुरवठ्यापेक्षाही मागणी अधिक झाल्याने भाववाढ होत आहे बाजारात कडब्याला मागणी अधिक असते साधारण मार्च ते जूनपर्यंत कडब्याची खरेदी विक्री होते जनावरांसाठी वाळलेला सकस आहार म्हणून कडब्याकडे पहिले जात असल्याने दूध व्यवसाय करणारा शेतकरी कडब्याला प्राधान्य देत आहे सध्या जनावरांचा बाजार तेजीत असून आजारी जनावरांना सांभाळणे पशुपालकासाठी अत्यंत कठीण होत असल्याचे चित्र सध्या बोधेगाव परिसरात दिसत आहे त्यावर होणाऱ्या खर्चाचा विचार करता ही जनावरे बाजारात नेऊन विकलेली बरी असा विचार आता पशुपालक करीत आहेत
चौकानात
दर वाढल्याने खरेदीवर परिणाम
हिरवा चारा आजारी जनावरांसाठी उपयुक्त असतो पाणी नसल्यामुळे चारा पिकांची लागवड झाली नाही त्यामुळे चाऱ्याचा तुटवडा जाणवत आहे कडबा आणि हिरव्या चाऱ्याची टंचाई शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरली आहे खरीप हंगामातील मका बाजरी या पिकांचा चारा शेतकऱ्यांनी साठवला आहे तूर गव्हाचे भूस पशुखाद्य म्हणून वापरले जात आहे पौष्टिक खाद्य म्हणून कडब्याला पसंती असते पण दर वाढल्याने खरेदीवर परिणाम पहायला मिळत आहे
चौकानात
सध्या चारा आणि कडबा महागला असून हिरव्या चाऱ्यानेही महागाईचा उच्चांक केला आहे हिरवा चारा तुलनेने कमी आहे तर उन्हाळी चारा पिके घेण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे कडब्याचे दर वाढत आहेत यावर्षा चारा पिकांच्या लागवड क्षेत्रात कमालीची घट झाली आहे बाजारातील कडबा आणि हिरव्या चाऱ्याचे दर वाढल्याने पशुधन सांभाळणे अवघड बनले आहे
प्रकाश काळे शेतकरी बोधेगाव

error: Content is protected !!