ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

घुलेचे कार्यकर्ते हाती कमळ धरणार?भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय रुचला नसल्याची चर्चा

घुलेचे कार्यकर्ते हाती कमळ धरणार?भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय रुचला नसल्याची चर्चा

शेवगाव ;- स्व . मारुतराव घुले पाटलापासून हातात घड्याळ घेऊन निवडणूक लढवलेल्या घुले कुटुंबातील माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवारांची साथ केली युती धर्मानुसार लोकसभा निवडणूकीसाठी भाजपचे उमेदवार डॉ सुजय विखे यांच्या प्रचारासाठी घुले बंधूंनी आघाडी घेतली आहे परंतु घड्याळ सोडून कधी भाजपला मतदान न केलेले कार्यकर्ते हाती कमळ धरणार का? याविषयी माञ चर्चांना उधाण आले आहे १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून घुले कुटुंबातील माजी आमदार नरेंद्र घुले चंद्रशेखर घुले जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले तसेच नव्या पिढीतील पंचायत समितीचे माजी सभापती डॉ क्षितीज घुले यांनी मागिल मागील २४ वर्षांपासून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केले वेगळ्या झालेल्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून २००९ साली विजयी होत चंद्रशेखर घुले विधानभवनात पोहचले परंतु २०१४ च्या निवडणुकीत चंद्रशेखर घुले यांना ५३हजारांच्या तर २०१९ च्या निवडणुकीत ॲड प्रतापराव ढाकणे यांना १४ हजारांच्या फरकाने मोनिका राजळे यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले असे असले तरी पराभवाच्या टव्केवारीचा आलेख कमी होत असल्याने आमदार मोनिका राजळे यांच्यावर देखील आत्मपरिक्षणाची वेळ आली आहे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना १० वर्षे सत्तेपासून दूर राहावे लागल्याने आता ते राष्ट्रवादी अजित पवार गटात समाविष्ट झाले आता युती धर्मानुसार त्यांना नगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉ सुजय विखे यांच्या प्राचारार्थ कमळ हाती घ्यावे लागले माञ हा निर्णय कार्यकर्त्यांना रुचला नसल्याची चर्चा आहे त्यामुळे खरच कमळाबाबत घुलेचे कार्यकर्ते सक्रिय राहणार का ? तुतारी वाजणार याविषयी चर्चेला उधाण आले आहे
चौकानात
लोकसभा निवडणूक झाली की विधानसभा निवडणूक होणार असली तरी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून मोनिका राजळे अजित पवार गटाकडून चंद्रशेखर घुले तर शरदचंद्र पवार गटाकडून ॲड प्रतापराव ढाकणे हे निवडणूक लढविणार असले तरी राजळे व घुले यापैकी तिकिट कोणाला मिळणार ही चर्चा आतापासूनच सुरू आहे

error: Content is protected !!