ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

जिल्हा रुग्णालयात ‘एमआरआय ‘ मशिन अभावी तर स्वरातीचे सिटी स्कॅन ४ महिन्यांपासून बंद रूग्णांची हेळसांड  ; शासनकर्ते उदासीन:- डॉ.गणेश ढवळे

जिल्हा रुग्णालयात ‘एमआरआय ‘ मशिन अभावी तर स्वरातीचे सिटी स्कॅन ४ महिन्यांपासून बंद रूग्णांची हेळसांड  ; शासनकर्ते उदासीन:- डॉ.गणेश ढवळे
—-
बीड:-  सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी असुन विकासाच्या पोकळ गप्पा मारणा-या लोकप्रतिनिधी आणि शासनकर्ते यांची सर्वसामान्य लोकांना आरोग्य सुविधा देण्याबाबत उदासिनता दिसून येत असुन जिल्ह्यातील सर्वांत मोठी आरोग्य संस्था असलेल्या जिल्हा रुग्णालयात अपघात,मेंदुत ताप गेलेले रूग्ण, शरीरातील नसांच्या वेदना आदि आजारांचे निदान करण्यासाठी आवश्यक असणारे एमआरआय मशिन सारखे उपकरण उपलब्ध नसल्याने निदान व उपचारास उशिर होत रूग्णांची हेळसांड होत असुन खाजगी केंद्रात जाऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे तर अंबेजोगाई येथील स्वरातीतील सिटी स्कॅन मशिन वारंवार नादुरुस्त असल्याने ४ महिन्यांपासून बंद आहे त्यामुळे तातडीने जिल्हा नियोजन निधीमधून निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर,शेख युनुस,सुदाम तांदळे,शिवशर्मा शेलार, मुस्ताक शेख यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, आरोग्य मंत्री, आरोग्य सचिव, पालकमंत्री बीड यांना केली आहे.

जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशिनची आवश्यकता ; शासनकर्ते उदासीन:- डॉ.गणेश ढवळे

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने १५ आगस्ट २०२३ पासुन सर्व तपासण्या आणि उपचार मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र औषधी,उपकरणे आणि तज्ञ पुरवताना हात आखडता घेतला असुन यामुळे सामान्य रूग्णांची हेळसांड होत असुन बीड जिल्हा रुग्णालयात रोज आंतररुग्ण विभागात ५०० च्या वर रुग्ण असतात तर बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी ७०० हुन अधिक रुग्ण येतात.दरम्यान अपघाती रुग्ण , मेंदुत ताप गेलेले रुग्ण, शरीरातील नसांच्या वेदना आदि आजारांचे निदान करण्यासाठी एमआरआय मशिनसारख्या उपकरणांची आवश्यकता असते.बीड जिल्हा रुग्णालयाला ७० वर्षे कालावधी उलटूनही जिल्ह्यातील सर्वात मोठी आरोग्य संस्था असलेल्या जिल्हा रुग्णालयात हे उपकरण नाही.या उपकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते यांनी आंदोलने करूनही शासनकर्ते आणि धोरणकर्ते यांच्यात फरक पडला नाही. जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशिन उपलब्ध नसल्याने जिल्हा रुग्णालयात आलेल्या रूग्णांची एमआरआय उपकरणाद्वारे तपासणी करायची असेल तर त्याला खाजगी केंद्रात तपासणीसाठी जावे लागते.आजारी रूग्णांची यामुळे फरपट होते.येण्याजाण्याच्या वेळेमुळे आजाराचे निदान व उपचार होण्यास उशीर होतो आणि तपासणी शुल्क भरावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे एमआरआय मशिनसाठी जिल्हा नियोजन निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात यावा.

अंबेजोगाई येथील स्वाराती रुग्णालयासाठी नविन सिटी स्कॅन मशिनसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा ; जुने मशिन ४ महिन्यांपासून बंद

ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांचा आधार असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयातील सिटी स्कॅन मशिन दुरुस्तीचे प्रयत्न निष्फळ ठरले असुन गेल्या ४ महिन्यांपासून मशिन बंद अवस्थेत आहे.त्यामुळे रूग्णांना खाजगी सिटी स्कॅन केंद्राचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.अंबेजोगाई येथील स्वाराती रूग्णालयातील सिटी स्कॅन मशिनला १२ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असल्याने त्याचे अपग्रेडेशन अथवा नविन यंत्राचे भाग बसवावे लागतात.मध्यंतरी जिल्हा नियोजन निधीतुन उपलब्ध झालेल्या ८० लाख रुपये निधीतुन अपग्रेडेशनसाठी संबंधित कंपनीच्या अभियंत्यांच्या पथकाने ३ दिवस काम करून यंत्र सुरू केले मात्र पुन्हा एक तसातच बंद पडले.दुसरा यंत्राचा भाग निकामी झाल्याचे अभियंत्याने स्वराती प्रशासनाला कळवले असुन रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी नविन सिटी स्कॅन मशिनची आवश्यकता असुन त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा.

error: Content is protected !!