ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

पाथरवाला बु. येथे मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागत

पाथरवाला बु. येथे मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागत

पाथरवाला ;- दरवर्षी प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथा सोहळ्यानिमित्त संघर्ष योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटिल यांनी दि.6 मे रोजी सायं 7 वाजता पाथरवाला बु. येथे भेट दिली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांचा वतीने भव्य मिरणुकी काढून पुष्पवृष्टी करून जरांगे पाटिल यांचे स्वागत करण्यात आले.
मौजे पाथरवाला बुद्रुक येथे श्रीनगद नारायण महाराजांचे उत्तर अधिकारी श्री माणिक बाबा यांच्या मूळ पादुका स्थापन आहेत या निमित्ताने ह.भ. प.महंत शिवाजी महाराज नारायण गडकर, नगद नारायण महाराज जन्मभूमी संस्थांचे महंत रंगनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह व शिव महापुराण कथा ह.भ. प .भागवताचार्य जगदीशानंद महाराज ढोले यांची संपन्न झाली यावेळी जरांगे पाटलांनी सप्ताहस भेट देऊन भाविकांना संबोधित केले आपसात भांडण करू नका, व्यसनापासून दूर राहा, दारू कुणी पेऊ नका असा संदेश दिला. मराठा आरक्षण प्रश्न सर्वांनी एकजूट राहा व गाव खेड्यातील ओबीसी व मराठा बांधव यांच्यात दुरावा न होता सर्वांनी गुण्यागोविंदाने नांदा असे संबोधित केले यावेळी महंत रंगनाथ महाराज ,जगदीश महाराज , राजदीप महाराज, वशिष्ठ महाराज, नागेश महाराज उपस्थित होते व ग्रामस्थ पंचक्रोशीतील व तालुक्यातील मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!