ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

बीड लोकसभेची निवडणूक अहंकारा विरूद्ध सामान्य माणसाची लढाई – माजी मंत्री सुरेश नवले

बीड लोकसभेची निवडणूक अहंकारा विरूद्ध सामान्य माणसाची लढाई – माजी मंत्री सुरेश नवले

ताईच्या अहंकाराने शेतकर्‍यांचा वैद्यनाथ साखर कारखाना बुडाला – नवले यांची सडकून टिका

गेवराई दि. 6 : सत्ता येईपर्यंत ओबीसी-बहुजन समाजाच्या नावाने मते मागायची. सत्ता येताचा विशिष्ट गटाचे लांगुलचालन करायचे. ताई, लोकांनी तुम्हाला ओळखले आहे. तुम्हाला खासदार व्हायचे तर व्हा, लोकशाहीत लोकांसमोर जाऊन मते मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतू ,खासदार व्हायचे म्हणून, मराठा-ओबीसी समाजात विष पेरू नका, बहुजन समाजा मध्ये जातीय तेढ निर्माण करून, मराठा समाज आपला नाही. ही तुमची विकृत मानसिकता जातीयवादाला खतपाणी घालणारी आहे. तुमच्या या जातीय मानसिकतेचा जाहिर निषेध व्यक्त करतो. बीड जिल्ह्य़ातील मायबाप जनता तुम्हाला धडा शिकवून, शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे यांना निवडून आणल्याशिवाय
स्वस्थ बसणार नाही. असा दृढ विश्वास माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी येथे बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, पंकजा ताई, तुमचा अहंकार एवढा की, भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री आहेत म्हणून, तुम्ही बहुजनांचे संत श्री. भगवान बाबांच्या दर्शनाला ही गेला नाहीत. बुडत्याचे पाय डोहा कडे, पंतप्रधान येऊदेत की, मुख्यमंत्री..! विधानसभेत तुम्ही 30 हजार मताने पडलात. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बीड जिल्ह्य़ात येऊन तुमचा प्रचार करायला येतील तेव्हा, तुम्ही 1 लाख नव्वद हजार मताने निश्चित पराभूत होणार आहात. ही निवडणूक, लोकांनी, मतदान मायबाप जनतेने हातात घेतली असल्याचा विश्वास ही प्रा. सुरेश नवले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.सोमवार ता. 6 रोजी दु. 12.30 वाजता ,गेवराई येथील शिंधी भवनात आयोजित करण्यात आलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत ते मुद्रित-इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या वार्ताहर आहेत बोलत होते. प्रा. नवले यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, खासदार डाॅ. प्रितमताई आणि विद्यमान उमेदवार पंकजाताई
दहा वर्ष नाॅटरिचेबल होत्या. त्या पुणे-मुंबईत राहतात. जनतेच्या सुखादुखाचे घेणे देणे नाही. ओबीसीची सहानुभूती मिळवायची, मराठा समाजाला नावे ठेवायचे निवडून यायचे धोरण ठेवून या लोकांनी आतापर्यंत काम केलय. निवडणुकी पुरते ओबीसी, कामे मात्र नातेवाईक, सगे सोयरे दिसतात. असा घणाघाती आरोप, प्रा. नवले यांनी केला. ते म्हणाले,
गेल्या दहा वर्षांत किती ओबीसी, मायक्रो ओबीसी व मराठा समाजातील कार्यकर्त्यांना कामे दिली. द्या यादी, आता माफी मागतो. असा रोकडा सवाल करून ते म्हणाले, स्व. मुंडे यांनी उभा केलेला कारखाना आज बंद अवस्थेत आहे. स्व. मुंडे साहेबांनी सर्वसमावेशक राजकारण केले. राज्यात,
वैद्यनाथ पॅटर्न महाराष्ट्र प्रसिद्ध केला. जगभरातून कौतुक झाले. कुठे आहे वैद्यनाथ कारखाना ? ताईंनी कारखाना बुडविला, शेतकरी, कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ कोणी आणली ? सांगा ताई ? तुमच्या अहंकाराने कारखाना बुडाला, असा थेट आरोप प्रा. नवले यांनी केला. बजरंग बप्पा सारखा सामान्य कार्यकर्ता एक नव्हे तर दोन कारखाने उभे करतो. शेती – मातीशी इमान राखून काम करणाऱ्या शेतकर्‍यांना सर्वाधिक भाव देऊन, खरा शेतकरी पुत्र कोण ? गेवराई तालुक्यातील माणूस जातीच्या पलीकडे जाऊन विचार करणारा आहे. मी, या मतदारसंघाचा भूमिपुत्र असून, मला गेवराई च्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे. बजरंग बप्पा यांच्या पाठिशी अठरापगड जातीची माणसे ठामपणे उभी राहतील आणि सर्वात मोठी लीड देतील. माझ्या मनात शंकाच नाही.विधानसभेत ताई 30 हजार मतानी पडल्यात,आता माहिती मिळतेय की, मा. पंतप्रधान सभेला येताहेत. या तुमचे स्वागत आहे. पण, मोदी साहेब येऊन गेल्यानंतर, 1 लाख नव्वद हजार मताच्या फरकाने ताईंचा पराभव ,ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे ही त्यांनी सांगितले.पत्रकार बांधवांनो , एक गुपित गोष्ट सांगतो. बीड लोकसभेच्या “अंडर करंट” निर्माण झालेले वातावरण आहे. असा उल्लेख करून ते म्हणाले, कुठय रेल्वे ? दहा वर्ष खासदार म्हणून डॉक्टर मुंडेनी बीड जिल्ह्य़ातील जनतेची फसवणूक केली. चार हिताच्या गोष्टी सांगा. पालकमंत्री, खासदार म्हणून काय केले. उसतोड कामगार, दुष्काळी भाग, उद्योगाच्या बाबतीत किती कामे केली. हे आधी सांगा, मग मते मागा. तुम्ही नैतिक अधिकार गमावला आहे.
हिंदुस्थानच्या इतिहासातल्या सर्वात निष्क्रिय खासदार म्हणून प्रितमताई मुंडे यांची नोंद झाल्यानेच, त्यांचे तिकिट कापले. बहिणीचे तिकिट कापून मी उभा राहणार नाही. अशी राणाभिमादेवी थाटातली घोषणा कुठे गेली ? कुठेय तुमचा स्वाभिमान ? मला देशाने [ पंतप्रधान नरेंद्र मोदी ] उमेदवारी दिली. राज्यातल्या नेत्यांने उमेदवारी दिलेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा इशारा असल्याचे ही नवले यांनी सांगितले. पत्रकारांच्या प्रश्नाला ही त्यांनी सडेतोड उत्तरे दिली. प्रा. नवले म्हणाले की,
चापलुसी करणे रक्ततात नाही. मी 19 97 साली मंत्री होतो. शिवसेना नेतृत्वाशी मतभेद झाले, पक्ष सोडला, आता ही सतेत होतो पण भुमिका पटली नाही. उलट माझ्या रास्त भुमिकेने शिंदे गटाला दोन जागा मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
बीड लोकसभेची लढाई अहंकारा विरूद्ध सामान्य माणसाची आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, पंकजाताई राष्ट्रीय नेत्या आहेत. माझ्या सारख्या सामान्य माणसाला त्या कशाला फोन करून वेळ घालवतील. मला तशी उपेक्षा ही नाही. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी फोन केल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, मी पालकमंत्र्यांना माझी भूमिका दोन शब्दात, स्पष्ट पणे सांगितल्याचे प्रा. सुरेश नवले यांनी शेवटी बोलताना सांगून, दिग्गज नेते भाजपा महायुती सोबत आहेत. सामान्य जनता महाआघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या सोबत असल्याने बप्पांचा विजय कोणी ही रोखू शकत नाही. असा दृढ विश्वास माजी मंत्री सुरेश नवले यांनी शेवटी व्यक्त केला. पत्रकार परिषदेत माजी आमदार सिराजभाई देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष आण्णासाहेब राठोड, ज्येष्ठ नेते सखाराम हकदार उपस्थित होते. आभार हकदार यांनी मानले.

error: Content is protected !!