ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

सुशी येथे आज महंत शिवाजी महाराजांचे काल्याचे किर्तन

सुशी येथे आज महंत शिवाजी महाराजांचे काल्याचे किर्तन

सप्ताहाच्या सांगतेप्रसंगी बहूसंख्येने उपस्थित रहा ग्रामस्थांचे आवाहन

गेवराई :गेवराई तालुक्यातील सुशी (व) येथील ३७ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची श्रीक्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती महंत प्रेममुर्ती शिवाजी महाराज (नारायणगडकर) यांच्या अमृततुल्य काल्याचे कीर्तनाने आज बुधवार दि.८ मे रोजी सांगता होणार आहे.तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ व समस्त भजनी मंडळ,सुशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
संत कुलभूषण महात्मा सद्गुरू श्री नगदनारायण महाराज व भगवान गोरक्षनाथ महाराज व भगवान कुंभेश्वर यांच्या कृपाशीर्वादाने सुरु असलेल्या सुशी (व) येथील अखंड हरिनाम सप्ताहात सात दिवस महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार मंडळींची सेवा झाली. सप्ताहामुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. तर या सप्ताहाची
श्री क्षेत्र नगद नारायण महाराज संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.महंत गुरुवर्य प्रेममुर्ती शिवाजी महाराज यांच्या अमृततुल्य काल्याच्या किर्तनाने दुपारी ११ ते १ यावेळेत सांगता होणार आहे. व नंतर महाप्रसादाचे वाटप होईल तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पंचक्रोशी परिसर व सुशी समस्त ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे.

error: Content is protected !!