ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

गेवराई येथे महाविकास आघाडीच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा- पुजा मोरे

गेवराई येथे महाविकास आघाडीच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा- पुजा मोरे

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासाठी बुधवारी दि.८ रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गेवराईमध्ये जाहीर सभा होणार आहे. तरी या सभेसाठी बीड जिल्ह्यातील जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन पुजाताई मोरे यांनी केले आहे.

बीड जिल्ह्याला मागील दहा वर्षांपासून भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्याला देशोधडीच लावण्याचे काम केले आहेत. दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगधंदे उभारले नसून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेऊन गेलेले आहे. यामुळे बेरोजगारी वाढलेली आहे. जिल्ह्यामध्ये विकास नाही. येथील राजकीय पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीच्या सिंचनाचा प्रश्न आणखीनही सोडला नाही. विद्यमान खासदार आणि बीड जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांनी जनतेला विकासापासून वंचित ठेवले आहे. सर्वसामान्य जनता आता भ्रष्टाचाराला, घराणेशाहीला कंटाळली आहे. ही घराणेशाही संपविण्यासाठी आणि बीड लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी आरोग्य मंत्री श्री. राजेश भैय्या टोपे यांची गेवराईमध्ये दि.०८ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता भाग्यलक्ष्मी लॉन्स , कोल्हेर रोड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी बीड जिल्ह्यातील नामवंत दिग्गज नेते, इंडिया आघाडीचे सहकारी पक्षांचे पदाधिकारी नेते येणार आहे. तरी या सभेस बीड जिल्ह्यातील सर्व मतदार जनतेनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पुजाताई मोरे यांनी केले आहे.

error: Content is protected !!