ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

जामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभा

जामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभा

जामखेड प्रतिनिधी;-नगर लोकसभा मतदारसंघातील मतदार ज्या सभेची आतूरतेने वाट पाहत आहेत. ती महाराष्ट्र राज्य चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा ९ मे रोजी आमदार प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड शहरातील बाजारतळ मैदानावर होणार आहे. याबाबतची माहिती भाजपचे शहराध्यक्ष पवन राळेभात यांनी दिली.

सध्या प्रचार अखेरच्या टप्प्यात असल्याने या सभेचे सर्वांना वेध लागले आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जामखेड च्या भूमीत प्रथमच येत आहेत. निवडणुकी खा. डॉ. सुजय विखे यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याने सध्या जिल्ह्यात त्यांचे वातावरण असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने त्यात अधीक भर पडणार आहे.

जामखेड शहरातील बाजारतळ येथील मैदान येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा ऐकण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी लोटणार असून त्याचे नियोजन करण्यात सर्व महायुतीचे घटक पक्ष काम करत असल्याचे जामखेड भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात यांनी सांगितले.

error: Content is protected !!