ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

पार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर 

पार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर
 कुठल्यातरी आंदोलनात बजरंग सोनवणे दिसले का?:- अशोक हिंगे पाटील
 बीड प्रतिनिधी;- पार्लमेंट हे देशाचे सुरक्षा कवच  आहे इथे नीतिमत्ता असणारा अशोक हिंगे सारखा उमेदवार निवडून द्या असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी केले ते आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोकराव हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर  सभेत बोलत होते
 पुढे बोलताना ऍड आंबेडकर म्हणाले की शरद पवार म्हणतात भाजपला हरवलं पाहिजे तर मग तुम्ही राजनाथसिहं  सोबत काय गुलूगुलू गप्पा मारता देशातील जनतेला मूर्ख बनवायचे प्रताप पवारांनी आता थांबवायला हवेत पवारांचे उमेदवार निवडून दिले तरी ते उद्या भाजपाच्या दावणीला जाऊन बसणार नाहीत याची शाश्वती काय?शरद पवार यांच्या आयाराम गयाराम भूमिकेमुळे मराठा समाजाची प्रतिमा मलिन होत आहे बीडमधून बजरंग सोनवणे यांना निवडून दिले तरी उद्या शरद पवारांच्या सांगण्यावरून सोनवणे मोदींच्या बाजूने जाऊन बसतील कारण राष्ट्रवादीकडे नीतिमता नावाची गोष्ट उरलेली नाही. मराठ्यांचे खरे विरोधक शरद पवारच आहेत असेही प्रकाश आंबेडकर यांनी निक्षुन सांगितले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन नवीन नाही 1987 पासून अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजासाठी आंदोलन केली आहेत मात्र सत्तेत असलेल्या शरद पवारांनी मराठा समाजाला कधी गांभीर्याने घेतलेच नाही असे सांगितले तर शरद पवार चळवळ संपविणारा नेता आहे त्यामुळे एका माणसामुळे सकल  मराठा समाज बदनाम होत आहे तो  होऊ देऊ नका असेही आंबेडकर यांनी मराठा समाजाला सांगितले भारतीय जनता पार्टी सर्वात बरबटलेला पक्ष आहे मोदी घटना विरोधी माणूस आहे आणि सर्वात खोटारडा पंतप्रधान आहे असा पंतप्रधान मी आतापर्यंत पाहिलाच नाही मोदीच्या या अशा वागण्यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात असून देश असुरक्षितते कडे वाटचाल करत आहे मोदी देशापेक्षा स्वतःला मोठे समजत आहेत त्यामुळे मोदी आणि आरएसएस प्रणित भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे असे सांगत देशाची पार्लमेंट (संसद) हे देशाचे सुरक्षा कवच आहे इथे नीतिमता असलेले म्हणजेच अशोक हिंगे सारखे तरुण तडफदार खासदार निवडून जाणे गरजेचे आहे असे मत ऍड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले
 मराठा आंदोलन, शाही न बाग आंदोलन, रेल्वे आंदोलनात बजरंग सोनवणे दाखवा आणि लाख रुपये मिळवा :- अशोक हिंगे पाटील
 मराठा आरक्षण आंदोलन, मुस्लिम समाजाचे शाईन बाग आंदोलन, बीड जिल्ह्याच्या रेल्वे प्रश्नावर झालेले आंदोलन यामध्ये कुठेही बजरंग सोनवणे यांचा सहभाग नव्हता असल तर मला दाखवा आणि लाख रुपये मिळवा अशा आव्हान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी केले आहे
 पुढे बोलताना हिंगे पाटील म्हणाले शरद पवारांनी माझ्या विरोधात दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात करून उभा केला जो उमेदवार स्वतःची कारखानदारी आणि स्वतःची दुकानदारी चालविण्यातच मग्न असतो त्याला जनतेच्या प्रश्नाशी काहीही देणे घेणे नाही आतापर्यंत मराठा आंदोलन झाले, मुस्लिम समाजाचे शाही न बाग आंदोलन झाले, रेल्वेच्या प्रश्नावर अनेक आंदोलने झाली इथे कुठे बजरंग सोनवणे यांचा सहभाग दिसला नाही मी गेल्या अणेक वर्ष मराठा समाजासाठी काम करतो आहे , मुस्लिम समाजाच्या शहीन बाग आंदोलनात सहभाग नोंदवला, दलित समाजाच्या न्याय हक्क मागण्यासाठी लढलो मात्र  आयत्यावेळी कारखानदारी दुकानदारी चालविणारे उमेदवार समोर येऊन जनतेला मताचे भीक मागत आहेत यांना जनतेकडे मते मागण्याचा कुठलाच  अधिकार नाही असेही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी सांगून येत्या 13 मे रोजी माझ्या नावासमोरील गॅस सिलेंडर चलनाचे बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजय करा असे आव्हान केले  यावेळी प्रकाश आंबेडकर, उमेदवार अशोक हिंगे पाटील, सर्वजित बनसोडे,विष्णु जाधव, तय्यब जफर, मुजमिल पटेल, रमेश गायकवाड, महेश निनाळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष महालिंग निकाळजे,शैलेश कांबळे, ज्ञानेश्वर कवठेकर,डॉ नितिन सोनवणे, धम्मनंद साळवे, अँड.अनिता चक्रे,प्रा.छाया हिरवे,  इंजि.विष्णु देवकाते,युनुस शेख,धम्मानंद कासारे, पुरुषोत्तम वीर,बालाजी जगतकर, अंकुश जाधव, सुदेस पोतदार भारत तांगडे,बाबुराव मस्के, प्रस्ताविक, अँड.राजेंद्र कोरडे, सुत्रसंचालन अजय सरवदे, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, समता सैनिक व  सर्व जिल्ह्याचे तालुक्याचे पूर्व व पश्चिम पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्ये उपस्थित होते. यावेळी
भीम आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मायदळे ,तालुका सचिन देशमाने यांचा अशोक हिगे यांना जाहिर पाठींबा दर्शविला
पारधी समाजाच्या महिलांचे शिष्टमंडळ भेटले अन्य अत्याचार प्रकरणी निवेदन घेऊन भेटले साहेबांनी या प्रश्न दखल घेतली
चौकट
 आरपीआय गवई गटाचा अशोक हिंगे यांना जाहीर पाठिंबा :- माणिक वाघमारे
 महायुती, महाविकास आघाडी हे दोन्ही पक्ष शेतकरी दिन दलित दुबळे यांची फसवणूक करणारे पक्ष आहेत यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देऊन संसदेत पाठवणारच असंही माणिक वाघमारे यांनी सांगितले यावेळी ए आय एम चे प्रदेशाध्यक्ष एजाज बाबर आष्टी येथील गोसावी समाजाच्या महिला नेत्या, मुस्लिम समाजाच्या महिला नेत्या यांनी वंचित बहुजन आघाडीचे जाहीर प्रवेश केला
error: Content is protected !!