ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजन

पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजन
अक्षय मुंदडा ठरले ‘मॅनेजमेंट गुरु’ !
 अंबाजोगाई – अंबाजोगाई शहराच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेचे नियोजन पंकजाताई मुंडे यांनी अत्यंत विश्वासाने युवा नेते अक्षय मुंदडा यांच्याकडे सोपविले होते. आज पर्यंतच्या एकाही पंतप्रधानांची अंबाजोगाईत कधीच सभा झाली नव्हती. त्यामुळे या सभेला विशेष महत्व होते. परंतु, पंकजाताईंचा विश्वास सार्थ ठरवत अक्षय मुंदडा यांनी सभेचे अत्यंत यशस्वी नियोजन करून त्यांच्यातील ‘मॅनेजमेंट गुरु’ ची प्रचीती सर्वांना दिली.
बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतली आहे. केज विधानसभा मतदार संघात आ. नमिता मुंदडा, नंदकिशोर मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पंकजाताईंच्या विजयासाठी जीवाचे रान केले आहे. तिघेही संपूर्ण मतदार संघात पायाला भिंगरी बांधल्यासारखे फिरत आहेत. मतदार संघातील शहरे, ग्रामीण भागात त्यांचा अक्षरशः डोअर टू डोअर प्रच सुरु आहे. याच दरम्यान पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ठरली. सभा नेमकी कुठे घ्याची यावर विचारविमर्श होत असताना पंकजाताई मुंडे यांनी सभेच्या नियोजनाची पूर्ण जबाबदारी अत्यंत विश्वासाने अक्षय मुंदडा यांच्यावर सोपवत अंबाजोगाईत सभा घेण्याचे निश्चित केले. नियोजनासाठी मिळालेला कमी कालावधी लक्षात घेता अक्षय मुंदडा यांनी तातडीने कामाला सुरुवात करत सहकाऱ्यांसह रात्रीचा दिवस केला. पंतप्रधानांची सुरक्षा आणि लोकांच्या सोयीचे होईल असे ठिकाण म्हणून कृषी महाविद्यालयाच्या मैदानाची सभेसाठी निवड करण्यात आली. दोनच दिवसात या ठिकाणी पंतप्रधानांसाठी तीन हेलिपॅड आणि मुख्यमंत्री व इतर नेत्यांसाठी वाघाळा येथे हेलिपॅड तयार करण्यात आले. किमान लाखभर लोक बसतील अशा पद्धतीने भव्य मंडप तयार करण्यात आला. मंडपात पंखे, कुलर यांची व्यवस्था. तळपत्या उन्हात ही थंडगार हवा, पिण्याचे पाणी, इलेकट्रोल पावडर अशा अनेक प्रकारची व्यवस्था करण्यात आली. मंडपातील शेवटच्या व्यक्तीलाही सभा पूर्ण दिसावी यासाठी मोठ्या प्रमाणात एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. अपेक्षेप्रमाणे लाखो लोकांनी सभेला उपस्थिती लावली. तरीसुद्धा कुठेही नियोजनाचा अभाव दिसून आला नाही किंवा सभेच्या ठिकाणी कसलाही गोंधळ अथवा असुविधा जाणवली नाही. सभा झाल्यानंतर पंकजाताई मुंडेंनी अक्षय मुंदडा यांचे जाहीर कौतुक केले.
पंतप्रधानांची चोख सुरक्षा व्यवस्था
सभेच्या नियोजनात पंतप्रधानांच्या सुरक्षेची अत्यंत बारकाईने काळजी घेण्यात आली होती. सभा जाहीर झाल्यापासून त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील अधिकारी अंबाजोगाईत तळ ठोकून होते. डोळ्यात तेल घालून नियोजनावर त्यांचे लक्ष होते, अनेकदा तपासणी केली जात होती.  त्यांच्या निवासाची, भोजनाची सर्व काळजी अक्षय मुंदडा यांनी घेतली. सभा संपल्या नंतर या अधिकाऱ्यांनीही अक्षय मुंदडा यांचे नियोजनाबद्दल कौतुक केले.
आमदारांमधील गृहिणीचे दर्शन
आ. नमिता मुंदडा यांच्या आई निवासस्थानी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री धनंजय मुंडे, सर्व आमदार पाहुणचार घेण्यासाठी येणार होते. व्हीव्हीआयपी व प्रमुख कार्यकर्त्यांची भोजन व्यवस्था निवासस्थानी करण्यात आली होती. नमिता मुंदडा यांनी प्रत्येक नेत्यांची आस्थेवाईक चौकशी करत स्वत:च्या हाताने स्नेहभोजन दिले. नामितांच्या वागणुकीतील नम्रपणा, आपलेपणा पाहून अनेकांना स्व.विमलताई मुंदडा अर्थात सासुबाईची आठवण झाली. कौटुंबिक व्यवस्थेची घाई असताना देखील राजकिय प्रोटोकॉल पाळत त्यांनी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे वाघाळा हेलिपॅडवर तत्परतेने जाऊन स्वागत केले. तर अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवासस्थानी येत असल्याचे कळताच त्यांनी सभास्थानाहून तत्काळ घराकडे धाव घेत त्यांचे स्वागत केले.
एक हजार पोलिसांच्या भोजनाचीही घेतली काळजी
पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासाठी राज्य भरातून पोलीस अधिकारी व कर्मचारी आले होते. या पोलिस बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या भोजनाची व्यवस्था येथील एका मंगल कार्यालयात अतिथी प्रमाणे करण्यात आली. नंदकिशोर मुंदडा स्वतः यावर लक्ष ठेऊन होते. सभेच्या निमित्ताने मुंदडा परिवाराने केलेले चोख नियोजन याची अंबाजोगाईत चर्चा आहे.
error: Content is protected !!