ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

राज्याबाहेरून दूध आणण्याऐवजी राज्यातील शेतकऱ्यांकडील दूध संकलन वाढविण्याचे मंत्री सुनिल केदार यांचे निर्देश

मुंबई, : विविध डेअरींच्या माध्यमातून राज्याबाहेरून दूध आणण्याऐवजी राज्यातील दूधसंकलन वाढवून राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी दिल्या.

मंत्रालयात, नागपूर येथे मदर डेअरी मार्फत उभारण्यात येणाऱ्या दूधाचे विविध उत्पादन प्रकल्प तसेच अमूल व मदर डेअरींच्या मार्फत राज्यात करण्यात येणाऱ्या दूध संकलनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त एच.पी. तुम्मोड यांच्यासह अमुल डेअरीचे प्रतिनिधी समीर नागवले, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे अनिल हतेकर आणि मदर डेअरीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री.केदार म्हणाले, मदर डेअरीने नागपूर येथे पाच लाख लिटर दूध संकलन करून त्याद्वारे दुधाची विविध उत्पादने तयार करावीत. यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल. त्याचबरोबर गोंदिया व भंडारा या जिल्ह्यातही दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दूध संकलन करण्यास तत्काळ सुरुवात करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यात विविध प्रकारचे दूध उत्पादन होते. त्याविषयी माहिती घेण्यात येईल. राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये राज्यातून आणि परराज्यातून दूध पुरवठा होत असून यामध्ये प्रामुख्याने पिशवी बंद दूध प्रमुख आहे. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या प्रमुख शहरात दूध पुरवठा करण्यात येतो. अमूल डेअरी रोज १६.८५ लाख लिटर पिशवी बंद दूध वितरण करते. याकरिता राज्यातील १०.६५ लाख लिटर दूध संकलन आणि ६.२० लाख लिटर परराज्यातून आवक करण्यात येत आहे. मदर डेअरी २.३० लाख लिटर पिशवी बंद दूध वितरण करते. नंदीनी डेअरी १.१० लाख लिटर दूधाचे वितरण करते, अशी माहिती दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडून देण्यात आली

error: Content is protected !!