ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

आर.आर.पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली

मुंबई, : ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’ आणि ‘तंटामुक्त गाव अभियाना’च्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलणारे, ‘आधुनिक गाडगेबाबा’ असा ज्यांचा गौरवपूर्ण उल्लेख होतो ते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, दिवंगत आर. आर. पाटील ऊर्फ आबांचा आज स्मृतीदिन. लोककल्याणकारी निर्णयाने राज्यातल्या घराघरात पोहोचलेल्या या लोकप्रिय नेतृत्वाला, महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन. राज्यात डान्सबार बंदी, गुटखाबंदीच्या निर्णयांची यशस्वी अंमलबजावणी, भ्रष्टाचारमुक्त पोलिस भरतीच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना पोलिस दलाची दारे खुली करणारे आर.आर. आबा त्यांच्या क्रांतिकारी निर्णयांसाठी राज्यातील जनतेच्या कायम स्मरणात राहतील.” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली.

error: Content is protected !!