ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

दोन वाहनांची समोरासमोर धडक, तीन जण ठार एक जण जखमी

इम्रान खान/करमाड
दोन चाकी गाडीची समोरासमोर धडक होऊन तीन जण जागीच ठार, तर एक जण जखमी झाल्याची भीषण घटना मंगळवारी रात्री नऊ च्या सुमारास धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाढंरी पिंपळगाव जवळ घडली.
गाडीची समोरासमोर धडक होऊन तीण जण ठार, तर एक चौदा वर्षीय मुलगी जखमी झाल्याची भीषण घटना मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास धुळे-सोलापुर महामार्गावरील पांढरी पिंपळगाव ता. औरंगाबाद येथे घडली.
शाम कृष्णा पगारे ( वय 32, रा .पारुंडी, ता.पैठण हे दुचाकीने ( एमएच 20 सीएक्स 5352 ) पिंपळगावकडुन आडुळकडे विरुद्ध दिशेने येत होते तर ज्ञानेश्वर तुळशीराम जाधव (वय 46 वर्ष )पत्नी सुवर्णा ज्ञानेश्वर जाधव (वय 40 वर्ष )मुलगी निकिता ज्ञानेश्वर जाधव (वय 14 वर्ष )तिघे रा .सुखापुरी , ता.अंबड , हल्ली मुकाम औरंगाबाद ) हे दुचाकीने ( एमएस 21 एवाय 9023) मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घरी औरंगाबाद येथे जात होते . त्याच वेळी पांढरी ( ता.औरंगाबाद ) येथील फाट्यावर या दोन्ही दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली . ग्रामस्थांना माहिती होताच घटनास्थळावर धाव घेऊन शासकीय रुग्णवाहिकेने जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवण्यात आले. मात्र तोपर्यंत या तिघांचाही मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस , जमादार बाबासाहेब होळंबे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली .अपघाताची नोंद करमाड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास जमादार बाबासाहेब होळंबे करीत आहेत .

error: Content is protected !!