ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

धक्कादायक! चार तृतीयपंथीयांची वाहतूक पोलिसाला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण.

धक्कादायक! चार तृतीयपंथीयांची वाहतूक पोलिसाला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण.

🔸अशोक काळकुटे | संपादक

मुंबई- घाटकोपर पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार तृतीयपंथीयांनी वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा जणांनी मिळून ट्रॅफिक हवालदाराला जबर मारहाण केली असून, त्याचा एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे, त्यानंतर ट्रॅफिक हवालदाराने पंतनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असुन त्या चारही आरोपींना अटक करण्यात आले आहे.

ड्युटीवर असताना पोलीस हवालदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण.

विक्रोळी वाहतूक विभागात कार्यरत असलेले ३८ वर्षांचे विनोद बाबुराव सोनवणे छेडानगर सब वे येथे ड्युटीवर असताना काल संध्याकाळी ०६ ते ०६:३० वाजताच्या दरम्यान एका रिक्षातून चार जण प्रवास करत होते. त्यावेळी ट्रॅफिक हवालदार विनोद सोनावणे यांनी त्यांची रिक्षा अडवली आणि रिक्षाचा फोटो काढला. विशेष म्हणजे रिक्षात बसलेले चारही जण तृतीयपंथीय होते. त्यानंतर तृतीयपंथीयांनी रिक्षातून खाली उतरत ट्रॅफिक हवालदार विनोद सोनवणे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर हवालदार आणि तृतीयपंथीयांमधील बाचाबाची थेट हाणामारीपर्यंत पोहोचली आणि त्या तृतीयपंथीयांनी हवालदाराला बेदम मारहाण केली. एका तृतीयपंथीयाने हवालदाराच्या शर्टाची बटणे तोडली, तर दुसऱ्या एकाने डोक्यावरील टोपी आणि वॉकीटॉकीचे नुकसान केले. त्यानंतर त्या चारही तृतीयपंथीयांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरोधात कलम ३५३, ३३२, २९४, ४२७, ५०४, ३४ भादंवी अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी त्या चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. लवली करण पाटील (२७ वर्षे), विकी रामदास कांबळे (२६ वर्षे), तनु राज ठाकूर (२४ वर्षे), जेबा जयंत शेख (२४ वर्षे) अशी अटकेतील चौघांची नावे असून, ते चौघेही घाटकोपर पूर्वेकडील पंचशीलनगरमध्ये वास्तव्याला आहेत.
पुढील तपास पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!