ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायती राष्ट्रवादीमय.

गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायती राष्ट्रवादीमय.

🔸अशोक काळकुटे | संपादक

२२ पैकी १४ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीच्या सरपंच व उपसरपंचाची निवड.

▪️गेवराई | प्रतिनिधी.
दि.१७ (प्रतिनिधी) ः- गेवराई तालुक्यातील सरपंच व उपसरपंच निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली असून आज झालेल्या आठपैकी पाच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच व उपसरंपच निवडून आले. तालुक्यात एकुण २४ पैकी १४ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आल्या असून ग्रामीण भागात राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे. माजी आ.अमरसिंह पंडित आणि माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

गेवराई तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाची निवड आज बुधवार, दि.१६ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. यापैकी तलवाडा, डोईफोडवाडी, चोपड्याचीवाडी, सुर्डी आणि खेर्डावाडी या पाच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच व उपसरपंच अविरोध निवडून आले. सर्वांचे लक्ष लागलेल्या तलवाडा ग्रामपंचायतची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती काबीज केली. तलवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ.मिना विष्णू हात्ते यांची तर उपसरपंचपदी शेख अक्रम जैनोद्दीन यांची निवड करण्यात आली. डोईफोडवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.स्वाती कृष्णा वाघमोडे यांची तर उपसरपंचपदी अंकुश दामू रोकडे यांची निवड करण्यात आली. चोपड्याचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ.अनुसया सखाराम टेहळे यांची तर उपसरपंचपदी उत्तम गिरजापा चोपडे यांची निवड करण्यात आली. सुर्डी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.मनिषा महादेव सोळंके तर उपसरपंचपदी सौ.शारदा नामदेव तवले यांनी अविरोध विजय मिळविला, खेर्डावाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.शिवकन्या राजेंद्र वाघमोडे यांची तर उपसरपंचपदी सौ.उर्मिला लक्ष्मण कादे यांची निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ.अमरसिंह पंडित व माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचाचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. आज झालेल्या आठपैकी पाच ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळविल्यामुळे गेवराई तालुक्यातील एकुण १४ ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ग्रामीण भागातही आपली ताकद पुन्हा एकदा वाढवली आहे. येणार्या काळामध्ये राष्ट्रवादीचा विचार घराघरात पोहोचवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी माजी आ.अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांचे हात बळकट करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. दरम्यान सरपंच व उपसरपंच निवडीनंतर तलवाडा, डोईफोडवाडी, चोपड्याचीवाडी, सुर्डी आणि खेर्डावाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

error: Content is protected !!