ब्रेकिंग न्युज
सत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवारविखेंच्या धनशक्तीसमोर लंकेंची जनशक्ती भारी – आ.भास्कर जाधव

शिरगाव रस्त्याचे काम तीन वर्ष रखडले, शिमगा आला तरी काम बंदच!

शिरगाव (काका भोसले यांजकडून) :- गेल्या अनेक वर्षापासून सातगाव भोसल्याचे वडील गाव शिरगाव आज शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षिते मुळे अनेक विकासकामांसाठी रखडलं आहे. यातच 2005 च्या अतिवृष्टि मुळे उखडलेल्या रस्त्याचे काम 16 वर्षे झाली तरी पूर्ण होत नाही याचे आश्चर्य वाटते.

मिळालेल्या माहितीनुसार खोपी-शिरगावचा जवळपास 10 कि.मी.चा दि.16 नोव्हेंबर 2018 रोजी शासनाच्या मुख्यमंत्री सडक योजनेतून पास करण्यात आला. व तसा फल कही धामणंद फाट्यावर शासनाध्यक्ष वतीने लावण्यात आला.सदर बांधकामाचा ठेकेदार मे मनिषा कंस्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले. ज्याचा मालक गुंडाप्पा माने असा प्रतिथयश पुणेकर ठेकेदार आहे.सुरुवातीच्या महिन्यांत त्याने खडीचा थर धामणंद फाटा ते श्री रामवरदायिनी मंदिर या दरम्यान टाकला. जवळपास 36 मो-या आणि चार 40 फुटी नाले अजुनही बांधकामाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र मातीच्या दुतफीॅ गटरचे काम ही काही अंशी ठेकेदाराने केले. मात्र कोरोना महामारीने खो घातला आणि काम तब्बल दोन वर्ष थांबले. कोरोनाची शिथिलता पाहता सदरचे काम मागच्या दस-यानंतर सुरु करण्याचे आश्वासन ग्रामस्थ आणि गावच्या पुढा-यांना ठेकेदार माने यांनी दिले होते. या गंभीर विषयावर रामवरदायिनी देऊळात पण आता काय करायचे यावर चर्चा- विमर्श ही झाला. पण ग्रामस्थांनी कोणताच निर्णय घेतला नाही याचेच आश्चर्य वाटते? तद्नंतर अनेक ग्रामसभा झाल्याचे सुतोवाच आहे ,पण संबंधित कंत्राटदाराविरोधात ना मोर्चा ना सामाजिक उद्रेक!
विशेष म्हणजे 4 कोटीच्या या टेंडरला प्रशासकीय पातळीवर ना उप अभियंता श्री धामापुरकर ना ही गुहागरचे स्थानिक शिवसेनाआमदार भास्करराव जाधव याबाबत खुलासा करीतआहेत. आश्चर्य म्हणजे शिरगाव गावतील भोसलेवाडी ते रघुविर घाट हा पलिकडचा रस्ता ही पास झालाय पण महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक अनास्थेपायी तो फक्त कागदावरच आहे.
तीन लेयर मधे सुरु करण्यात येणा-या या डांबरीकरणाची एकुण रुदी 7.50 मीटर आहे मात्र ठेकेदाराने तो 4 मीटरवरच केलाय. भविष्यात या गावचे ग्रामदैवत श्री रामवरदायिनी मातेचे 3.50 कोटींचे मंदिर जीर्णोद्धार काम लवकरच सूरू होणार आहे. या कामी होणारी रस्ता वाहतुक जसे लोखंड, सिमेंट, दगड,पाणी टॅंकर, अशी अनेक कामे याच मुख्य रस्त्याने होणार असल्याने व़ळणा-वळणावर कशी यातयात होणार असा प्रश्न उभा ठाकला आहे! यातच पुढच्या महिन्यात शिमगा उत्सवासाठी हजारो चाकरमानी आपल्या मुलांबाळाना घेऊन देवीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी ये-जा करणार आहेत, मात्र रस्ताच नसल्याने देवीच्या उत्स्वात कसे प्रसन्न मनाने येतील याचे साधे भानही कुणाला नाही. कारण शासनाने कामाची सुरुवातीची तारीख दिलीय मात्र, *काम पूर्ण दिनांक* फलकावर जाणूनबुजून दिली नाही! यात नेमकं काय राजकारण दडलय हे शासकीय पातळीवर कळत नाही.

error: Content is protected !!