ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

वाळु प्रश्नी बाळासाहेब थोरातांनी विधानभवनातच बुधवारी तातडीची बैठक घेण्याचे दिले आश्वासन

वाळु प्रश्नी बाळासाहेब थोरातांनी विधानभवनातच बुधवारी तातडीची बैठक घेण्याचे दिले आश्वासन
,,,,,,,
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीसांच्या उपस्थित आ.लक्ष्मण पवार व राजेश पवारांचे विधानभवनातील उपोषण मागे
,,,,,
गेवराई: मतदारसंघातील गोदावरी व सिदफना नदी पाञातुन मोठ्या प्रमाणात विना परवाना आवजड वाहनाने वाळु उपसा केला जातो त्यामुळे शासनाचा महसुल मोठ्या प्रमानावर तर बुडतोच,आवजड वाहनाने वाळू वाहतूक केल्यामुळे रस्त्यांची देखील दुरावस्था होते व सुसाट वेगाने वाहणाऱ्या आवजड वाहनांमुळे नागरिकांच्या जीवितास देखील धोका निर्माण होतो. या सर्व बाबतीत तहसीलदार,जिल्हाधिकारी व सचिवांपर्यंत वेळोवेळी मागणी करून निर्णय न झाल्यामुळे आमदार लक्ष्मण पवार यांनी शेवटी काही मागण्या ठेवून विधानभवणातच दिनांक 2 मार्च रोजी आमरण उपोषण सुरू केले 1) टेंडर काढताना वाळुची अपसेट किमंत कमी करावी 2)वाळु वहातूक टिपर व हायवा ऐवजी फक्त ट्रॅक्टरनेच करावी 3) वाळु वहातूकीमुळे खराब झालेले रस्ते तात्काळ दुरूस्त करून द्यावेत 4) गोरगरिबांना घरकुलासाठी मोफत वाळु द्यावी.या अत्यंत संवेदनशील विषयाची दखल घेऊन विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणीस यांनी उपोषणस्थळी भेट दिली व उपोषणास पाठिंबा दर्सगावीला. महसुल मंञी बाळासाहेब थोरात काही कारणामुळे मुंबईत नसल्यामुळे त्यांच्याशी विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी संपर्क केला व त्यांना उपोषणाबाबत माहिती दिली. महसूल मंत्री बाळासाहेबाजी थोरात यांनी उद्या म्हणजे 3 मार्च रोजी विधान भवनात दोन्ही आमदारांच्या उपस्थित तात्काळ बैठक लावून सर्व मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिल्यामुळे विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणीस याच्या उपस्थित आ.लक्ष्मण पवार व व राजेश पवार यांनी उपोषण तुर्तास मागे घेतले आहे

error: Content is protected !!