ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

चीनची चौकशी केली तर भाजपाला त्रास का? सचिन सावंत यांचा बावनकुळेंना सवाल

 

मुंबई :  महाराष्ट्रात वीजपुरवठा खंडित झाल्याप्रकरणी चीनच्या सायबर घुसखोरीचा आरोप ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. तसेच संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते. यावर भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. आता बावनकुळे यांच्या टीकेला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

“भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे हे चीनचे समर्थक आहेत का? चीनची भाषा का बोलत आहेत? चीनच्या रेड इको या ग्रुपचा हात असू शकतो असा अमेरिकेच्या रेकॉर्डेड फ्युचर या कंपनीने भारताच्या सर्टीनला अहवाल दिला आहे. सायबर सेलने ही शक्यता वर्तवली आहे. चीनची चौकशी केली तर भाजपाला त्रास का?”  असा सवाल त्यांनी विचारला आहे.

तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा बावनकुळे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. “मुंबई येथील वीज बंद प्रकरण हा तांत्रिक विषय आहे. हा विषय चंद्रशेखर बावनकुळे यांना समजू शकणार नाही. त्यांनी या विषयावर बोलून स्वतःचं हसं करून घेऊ नये.” असा टोला देशमुख यांनी ट्विटद्वारे लगावला आहे.

 

error: Content is protected !!