ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

महिला दिनाचे औचित्याने महिला सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार.

महिला दिनाचे औचित्याने महिला सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️नांदगाव | प्रतिनिधी.
-महिला दिनाचे औचित्य साधून के.सि. नहार पतसंस्था बोलठान च्या वतीने नवनिर्वाचित महिला सरपंच,उप सरपंच, व सदस्य यांचा सत्कार
नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील लोकनेते कन्हैयालाल नहार नागरी सहकारी पथ संस्था बोलठाण च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत गोगड हे होते ,या कार्यक्रमाचे उद्देशय नूकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच निवडून आलेल्या घाट माथ्यावरील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करून त्यांना पुडील वाटचालीस राजकीय क्षेत्रांतील मान्यवरां कडून मार्गदर्शन करने हा होता,
या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना न्यायडोंगरी ग्रामपंचायत च्या माजी सदस्या श्रीमती आश्विनी आहेर यांनी गावाचा विकास करीत असताना मासिक मीटिंग,प्रोसिडिंग, व वार्षिक आराखडा व शासनाचे परिपत्रक यावर जोर दिला तर गावाचा विकास करण्यास मदत होईल अशे सांगितले,
तर पंचायत समिती चे उप सभापती श्री सुभाष नाना कुटे यांनी ग्रामपंचायत चे महत्त्व व कार्य सांगितले ,गावाचा विकास करतांना स्वच्छ गाव व सुंदर गाव यावर जास्त भर देण्यात यावा असे सांगितले,ग्रामसभे चे महत्त्व सांगतांना ज्या प्रमाणे तालुक्या साठी आमसभा,राज्यासाठी विधानसभा, देशासाठी लोकसभे चे जेवढे महत्त्व आहे तितकेच महत्व गावासाठी ग्रामसभे चे असल्याचे सांगितले गावाच्या विकासा साठी कुठलीही अडचण भासल्यास ती सोडवण्यासाठी आपण कधीही हजर असल्याचे आश्वासन श्री कुटे यांनी दिले
या कार्यक्रमाचे शेवट अध्यक्षांनी आपल्या भाषणाने करतांना सांगितले की राजकीय क्षेत्रात तरुणांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होत असल्याने पुढारी नावाचा प्राणी हा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे म्हणोन तरुणांनी काळाची गरज म्हणून राजकारणात उतरावे जेणे करून नवीन पिडीच्या हातात सत्तेचे समीकरण येऊन देश प्रगतीच्या मार्गावर जाईल आणि घराणे शाही संपुष्टात येईल
यावेळी पंचायत समिती उप सभापती सुभाष कुटे,आश्विनी आहेर,अमोल आहेर,मच्छिंद्र पठाडे, अनिल तात्या रिंढे,रफिक पठाण,चंद्रकांत गोगड,राजेन्द्र शेट नहार,सुभाष नहार,विजू पाटील,बंडू पाटील,रामदास पाटील,जयंत भाऊ सानप, विनोद इपर, समाधान जाधव इसाक शेख, अरुण खूटे,अंबादास खूटे इ,उपस्तीत होते.

error: Content is protected !!