बीडमध्ये पुन्हा लॉक डाऊन? जिल्हाधिकार्यांचे निघाले आदेश.
🔸अशोक काळकुटे | संपादक
बीड- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील रेस्टॉरंट, बियर बार,पान टपरी,खानावळ,मंगल कार्यलये,फंक्शन हॉल यापुढे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत.
तसेच १८ मार्च २०२१ पासून सायंकाळी सात ते सकाळी सात पर्यंत सर्व दुकाने बंद करण्याचे आदेशात म्हटले आहे. हे दुकाने अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचे देखील आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना वाढत असल्याने गर्दी होणारे ठिकाणे, हॉटेल, रेस्टॉरंट, बियरबार, खानावळी बंद करण्यात आल्या आहेत. तसेच १८ मार्च २०२१ तारखेपासून सर्व दुकाने सायंकाळी ०७ ते सकाळी ०७ पर्यंत बंद राहतील असेही या आदेशात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बीड जिल्ह्यातील कोरोना चा वाढत असलेला आकडा लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे. परंतु या निर्णयाला सामान्य जनतेतून किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल कारण गेल्या लॉकडाऊन ने सामान्यांचे कंबरडे मोडले असल्याने त्यांच्यासमोर तीन वेळच्या जेवणाचा प्रश्न आ वासून उभा असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्याने सामान्यांमधुन मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे.