ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

मौजे लिंबुटा येथे ग्रामस्थांकडून श्रमदानास उत्स्फुर्त प्रतिसाद.

मौजे लिंबुटा येथे ग्रामस्थांकडून श्रमदानास उत्स्फुर्त प्रतिसाद.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️प्रेमनाथ कदम | परळी.
परळी तालुक्यातील मौजे लिंबुटा येथे रविवार, दि.१४ मार्च रोजी सकाळी ८.०० वाजता श्रमदानास प्रारंभ करण्यात आला.या श्रमदानात गावातील मुख्य रस्ता व गावाच्या दक्षिण-पूर्व गल्लीतील या वर्षी लावलेल्या वृक्षांच्या अनावशक फांद्या छाटणी,मोठ्या झालेल्या वृक्षांच्या संरक्षक जाळ्या काढून आधिक आवशकता असलेल्या छोट्या झाडांना लावणे.शेळ्यांच्या तोंडाला झाड फांद्या येऊनयेत म्हणून काटेरी फांद्या अर्थात कुपाट्या झाडांंच्या बुडांना बांधणे ,गरज असेल अशा झाडांचे आळे करून घेणे ,अशी कामे, या श्रमदानातून करण्यात आली. मागच्या रविवारच्या श्रमदानातही अशीच कामे करण्यात आली होती. आज वाल्मिक नवनाथराव मुंडे यांच्या हस्ते त्यांच्याच घराजवळ कारंजाच्या रोपाची लागवड करण्यात आली.त्यास व घराजवळील इतर पाच झाडे जोपासण्याची जबाबदारीही त्यांनी स्विकारली.
या श्रमदानात संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था,लिंबुटा संचलित सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती पदाधिकारी सल्लागार रामदासराव साहेबराव दिवटे(नाना ),कार्याध्यक्ष विश्वनाथ बंकटराव मुंडे,सदस्य विकास ज्ञानोबा दिवटे,ग्रामस्थ देविदासराव मुंडे,ग्रामस्थ वाल्मिक नवनाथराव मुंडे,सहसचिव इंद्रमोहन मुंडे,कोषाध्यक्ष शिवाजी रामराव मुंडे,ग्रामस्थ गुहेक सोपानराव मुंडे,रूस्तुमराव जाधव,शेषेराव जनार्धन मुंडे,महादेव सुर्यकांत मुंडे ,सखाराम एकनाथराव मुंडे,अशोक लिंबाजी मुंडे आदिंनी आपले अमुल्य योगदान दिले.

error: Content is protected !!