ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

आरक्षणाच्या मुद्यावर राज्यांना उत्तर देण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून आठवडाभराची मुदतवाढ

आरक्षणाच्या मुद्यावर राज्यांना उत्तर देण्यास सर्वोच्च न्यायालयानं आठवडाभराची मुदतवाढ दिली आहे.

मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं, शिक्षण तसंच सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची ५० टक्के मर्यादा आणि सामाजिक – आर्थिक मागास प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार या दोन्ही मुद्द्यांवर उत्तर देण्यासाठी सर्व राज्यांना नोटीस पाठवली होती.

काही राज्यांनी हे उत्तर देण्यासाठी मुदत मागितली, तर काही काही राज्यांनी पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणुका असल्यानं, ही सुनावणी स्थगित करण्याची विनंती केली, मात्र न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या सुनावणीला स्थगिती देण्यास नकार देत राज्यांना उत्तर देण्यास आठवडाभराची मुदतवाढ दिली.

आरक्षणावरच्या ५० टक्के मर्यादेचा फेरविचार होऊ शकतो का या मुद्यावरही काल चर्चा झाली.दरम्यान, निवडणुकीत मतदारांनी मतदान यंत्रावरचा वरीलपैकी कुणीही नाही – नोटा, हा पर्याय अधिक वापरला आणि उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक मतं मिळाली तर संबंधित निवडणूक रद्द व्हावी अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे नोटाला अधिक मतं मिळाल्यास पुन्हा नव्याने मतदान घ्यावं का, असं सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग तसंच केंद्र सरकारला विचारलं आहे. यासंदर्भात चार आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

error: Content is protected !!