ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

पेन्शनर संघटनेच्या वतीने खा. धैर्यशील माने यांचा सत्कार

कोल्हापूर : देशात खाजगी निमसरकारी, सहकार क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेल्या ६७ लाख कामगारांना पेन्शनवाढ होईपर्यन्त केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन खा. धैर्यशील माने यानी दिले.संसदेत पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शून्य प्रहारात खा. धैर्यशील माने यानी केंद्राच्या ईपीएस ९५ योजनेतील ६७ लाख पेन्शनरांना खा. खोशियारी समितीच्या शिफारसी प्रमाणे पेन्शनवाढ लागू करून केंद्र सरकारने संवेदनशिलता दाखवून न्याय द्यावा अशी मागणी केली होती.

या अनुषंगाने निवृत्त कर्मचारी ईपीएस ९५ राष्ट्रीय समन्वय समिती व कोल्हापूर जिल्हा पेन्शनर संघटनेच्या वतीने खा. माने यांचा शाल फेटा बांधून जेष्ठ पेन्शनर आनंदराव आबीटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी बोलताना खा.माने म्हणाले संसदेत पेन्शनवाढीचा प्रश्न उपस्थित केलेवर दिल्लीतील पेन्शनर संघटना भेटल्या तसेच इतर ठिकाणाहूनही पेन्शनरांनी संपर्क करून अभिनंदन करीत आपल्या व्यथा मांडल्याचे सांगून पेन्शनवाढी संदर्भात लेखी उत्तराची मागणी केली असून पेन्शनरांचे सर्वच प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगीतले.

केंद्र सरकारने पेन्शनवाढीसाठी नेमलेल्या समित्या वेळकाढू आहेत ते थांबवून तात्काळ पेन्शनवाढीचा निर्णय व्हावा, पेन्शनरांच्या निधनानतंर पत्नीस अर्धी पेन्शन मिळते ती पूर्ण मिळावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. निवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समितीचे समन्वयक दिलीप पाटील, राष्ट्रीय सदस्य शिवाजी देसावळे, शिवाजी सावंत, कोल्हापूर जिल्हा पेन्शनर संघटनेचे संघटक सुभाष गुरव,के.डी.माने, शंकर चांगले, आनंदा दिंडे,के.डी. पाटील, जे.के.बेलेकर यासह पेन्शनर उपास्थित होते

error: Content is protected !!