ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

सिलेंडर स्फोटात एकाच कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू.

सिलेंडर स्फोटात एकाच कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️कृष्णा आंधळे | प्रतिनिधी.
नाशिकमध्ये इगतपुरीवाला चाळीमागील संजरीनगर सोसायटीतील फ्लॅटमध्ये गॅस सिलिंडर बदलताना गॅसगळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेतील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, आज (रविवार) मुस्कान वलीऊल्लाह अन्सारी (वय २१) यांचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला. नणंद भावजयीसह चार सख्ख्या भावांचा व एका बहिणीचा असे सात जणांचा बळी या दुर्घटनेत गेला. दरम्यान गॅस सिलिंडर स्फोट दुर्घटनेतील एकमेव उरलेल्या मुलीचा देखील आज मृत्यू झाल्याने दुर्घटनेतील सर्व जळालेल्या जखमींचे मृत्यू झाले आहेत. गॅस सिलिंडर स्फोटात रहीम सय्यद व वलिऊल्लाह अन्सारी यांच्या कुटुंबातील सात व्यक्ती गंभीररित्या जळून जखमी झाले होते. उपचारार्थ रुग्णालयात दाखल असताना घटनेच्या नऊ दिवसात एका पाठोपाठ मृत्यूचा सिलसिला सुरु झाला. काल दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. आज बहिण मुस्कान वलिऊल्लाह अन्सारी (२१) हिचा उपचार दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.

गॅस सिलिंडर स्फोटात नणंद भावजयीसह चार सख्खे भाऊ व बहिणीचा बळी गेला. मृतांची संख्या सात होवुन स्फोटातील सर्व जळीत जखमींचे मृत्यू झाले आहेत. इगतपुरीवाला चाळीतील संजरीनगरातील या एका पाठोपाठ मृत्यूच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, या भागात शोककळा पसरली आहे . स्फोटात आपले सर्व काही गमावलेल्या रहीम सय्यद व वलिऊल्लाह अन्सारी हे उघड्यावर आले आहेत. स्फोटात घरातील सर्व संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. पुर्वीच हलाखीची परिस्थिती असलेल्या या कुटुंबातील कमावते कर्ते मृत्युमुखी पडल्याने कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी तातडीने शासकीय आर्थिक मिळण्यासाठी होप फॉउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी मदतीची घोषणा न केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सईदा सुलतान सय्यद, नसरीन नुसरत सय्यद या नणंद भावजयीच्या पाठोपाठ लियाकत रहीम सय्यद, नुसरत रहीम दुर्घटनेत मृत्यू झाला होता. आणखी दोन सख्खे भाऊ सोहेब वलिऊल्लाह अन्सारी रमजान वलीऊल्लाह अन्सारी त्यांची सख्खी बहिण मुस्कान वलीऊल्लाह अन्सारी यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

शुकवारी रात्री २ एप्रिल रोजी इगतपुरीवाला चाळीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या संजरीनगर सोसायटीच्या फ्लॅट नंबर ७ मध्ये गॅस सिलिंडर बदलत असतानाच गॅस गळती होवून सिलिंडरचा स्फोट झाला होता. सिलिंडर स्फोटात ९० टक्के पेक्षा अधिक भाजलेल्यांची प्रकृती सुरवातीपासून चिंताजनक बनलेली होती. रुग्णालयात उपचार दरम्यान या सातही जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने रहीम सय्यद व वलीऊल्लाह अन्सारी यांच्या कुटुंबियांवर मोठे आघात व दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

error: Content is protected !!