ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

नाशिकमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतला मोठा निर्णय

नाशिक

– नाशिक मध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नाशिक मधील सर्व शाळा कॉलेजेस आणि खासगी कोचीन क्लाससेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून १५ मार्च नंतरच्या विवाह सोहळ्याला बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक स्थळे ही सायंकाळी ७ ते सकाळी ७ बंद तर शनिवार रविवार ही धार्मिक स्थळे संपूर्ण दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे.सातत्याने आवाहन करूनदेखील नियमांचे पालन होताना दिसत नाही, तसेच बाजारपेठांमधील गर्दी कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.
त्याच प्रमाणे हॉटेल बार आणि परमिट रूम यांना ५० टक्क्यांच्या क्षमतेने सुरु करण्यास परवानगी असून त्यांना रात्री ९ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे  हा निर्णय जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. 
गर्दीच्या स्थळांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असून  उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई कठोर होणार

हे आहेत निर्णय

नाशिक, नांदगाव, निफाड, मालेगाव सर्व शाळा बंद

धार्मिक सोहळे,सामाजिक समारंभ राजकीय सभा पूर्णपणे बंदी 

वीकेण्डला सर्व धार्मिक स्थळे बंद

जीम, मैदाने, स्विमिंग टँक केवळ व्यक्तिगत सरावापुरता. स्पर्धा, गर्दी बंदी.

हॉटेल, परमिट रुम, बार सर्व सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत निम्म्या क्षमतेने सुरू राहतील

विवाह सोहळ्यांना १५ मार्चनंतर बंदी.

सर्व आठवडे बाजार बंद

भाजी मंडई ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार 

दहावी बारावीचे वर्ग ऐच्छिक राहील. ऑनलाईन घेतल्यास उत्तम 

Mpsc ,Upsc परीक्षा वेळापत्रका नुसारच 

जिम,मैदाने,स्विमिंग टॅन्क व्यक्तिगत सुरू राहतील,कोणत्याही स्पर्धा घेता येणार नाहीत

जीवनावश्यक वस्तू (मेडिकल, वृत्तपत्र, दूध इ.) वगळून इतर आस्थापना सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच सुरू राहतील. त्यानंतर दुकाने बंद होतील.

कोरोना जनजागृती सप्ताह सुरू करणार
महेश सालमुठे

error: Content is protected !!