ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

रिसोड येथील धरणातील जलसाठा घटल्यामुळे पिवळसर पाण्याचा पुरवठा-सभापती पप्पीबाई कदम.

रिसोड येथील धरणातील जलसाठा घटल्यामुळे पिवळसर पाण्याचा पुरवठा-सभापती पप्पीबाई कदम.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️महेंद्र कुमार महाजन | रिसोड.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या आडोळ धरणाची पाणी पातळी खाली गेली असल्यामुळे धरणातील पाण्याचा रंगच पिवळसर झाला आहे.त्यामुळे मागील काही दिवसांपासून नळाद्वारे येणारे पाणी पिवळसर दिसत आहे.नगर परिषद पाणी पुरवठा प्रशासनाने जलशुद्धीकरण करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया नियमितपणे पूर्ण केली परंतु पाण्याचा पिवळसर रंग काही प्रमाणात कायम राहला. पिवळ्या रंगाचे पाणी येत असल्यामुळे नागरिकांमध्ये पाण्याच्या शुद्धतेविषयी संभ्रम निर्माण झाला होता.नगर परिषद प्रशासनाने पाण्याचा नमुना तपासणीसाठी पाठवला असता पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.चार तास जलशुद्धीकरण प्रकल्प बंद ठेवावा लागत असल्यामुळे शहरातील काही भागात पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी होण्याची शक्यता आहे यासंबंधी संपूर्ण शहरात ध्वनिक्षेपका द्वारे सूचित केले आहे. रिसोडकरांसाठी आडोळ प्रकल्प वरदान असून संपूर्ण रिसोडकरांना कडक उन्हाळ्यामध्ये मुबलक पाणीपुरवठा होत असल्यामुळे शहरवासीयांची तहान भागविली जाते.
झपाट्याने धरणाची कमी होत चाललेली पाणी पातळी लक्षात घेता नागरिकांनी नळाचे पाणी आवश्यकतेनुसारच वापरून पाण्याचा दुरुपयोग टाळण्याचे व नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पाणी पुरवठा सभापती पप्पीबाई कदम यांनी केले आहे.

error: Content is protected !!