ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

पडिक्कल, विराट जोडीने इतिहास रचत मिळवला १० गडी राखून रॉयल विजय!

पडिक्कल, विराट जोडीने इतिहास रचत मिळवला १० गडी राखून रॉयल विजय!

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️कृष्णा आंधळे | प्रतिनिधी.
देवदत्त पडिक्कलने आपले पहिले वहिले आयपीएल शतक ठोकत राजस्थान विरुद्धचे १७८ धावांचे आव्हान आरसीबीला लिलया पार करुन दिले. पडिक्कल बरोबरच दुसरा सलामीवीर विराट कोहलीनेही ४७ चेंडूत नाबाद ७२ धावा ठोकल्या. या दोघांनी १८१ धावांची नाबाद सलामी दिली . आरसीबीकडून ही आतापर्यंतची सर्वोच्च सलामी ठरली. याचबरोबर या सामन्यात पडिक्कलने १९ व्या वर्षी आयपीएल शतक ठोकत सर्वात कमी वयात आयपीएलमध्ये शतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. तसेच विराटनेही आपल्या आयपीएलमधील ६ हजार धावा पूर्ण करत आयपीएल इतिहासात ६ हजार धावा पूर्ण करणारा तो पहिला खेळाडू ठरला.

राजस्थान रॉयल्सने ठेवलेल्या १७८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरने दमदार सुरुवात केली. सलामीवीर देवदत्त पडिक्कलने तुफान सुरुवात केली. त्याने पॉवर प्लेमध्येच आरसीबीला ५९ धावांपर्यंत पोहचवले. त्यात त्याचा ४१ धावांचा वाटा होता. पॉवर प्लेनंतर त्याने आपले अर्धशतक पूर्ण करत धावगती आणखी वाढवली. दुसऱ्या बाजूने विराट कोहली बॉल टू रनच्या रणनितीने खेळत होता.

पडिक्कलच्या धुवांधार फलंदाजीमुळे आरसीबीने १० व्या षटकातच शतकी मजल मारली. इथेही पडिक्कलने सिंहाचा वाटा उचलत ८० धावांचे योगदान दिले. १० व्या षटकानंतर विराट कोहलीने आपला गिअर बदलला. ३४ चेंडूत अर्धशतकापर्यंत मजल मारली. दरम्यान, त्याने आपल्या आयपीएलमधील ६ हजार धावाही पूर्ण केल्या. असा करणारा तो पहिला खेळाडू ठरला. दरम्यान, आरसीबीने १४ व्या षटकातच आपले दीडशतकही पार केले. पडिक्कलही आपल्या शतकाकडे वेगाने पुढे सरकत होता.

अखेर त्याने आपले आयपीएलमधील पहिले वहिले शतक ५१ चेंडूत पूर्ण केले. त्याच्या शतकाबरोबरच आरसीबीचा विजयही दृष्टीक्षेपात आला होता. विजयासाठी आवश्यक असलेल्या ४ धावा विराट आणि पडिक्कलने शांतपणे सिंगल घेत पूर्ण केला. आरसीबीने राजस्थान रॉयल्सचे १७८ धावांचे आव्हान १६.३ षटकातच बिनबाद पार केले. देवदत्त पडिक्कलने ५२ चेंडूत तडाखेबाज नाबाद १०१ धावा केल्या. तर विराट कोहलीने ४७ चेंडूत ७२ धावा ठोकल्या. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. आरसीबीचा गोलंदाज
मोहम्मद सिराजने सुरुवातीपासूनच टिच्चून मारा करत राजस्थानचे सलामीवीर जोस बटलर आणि मनन वोहरा यांना बांधून ठेवले. सिराजच्या दुसऱ्या षटकात बटलरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न फसला आणि त्याचा ८ धावांवर त्रिफळा उडला. बटलर पाठोपाठ मनन वोहराही कायल जेमिसनच्या गोलंदाजीवर ७ धावांची भर घालून माघारी परतला. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर आलेल्या डेव्हिड मिलरलाही भोपळा फोडण्याची संधी मिळाली नाही. त्याला सिराजने पायचित बाद केले. राजस्थानचे १८ धावात ३ फलंदाज माघारी गेल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबेने डाव सावण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी भागिदारी रचण्यास सुरुवात केली पण, वॉशिंग्टन सुंदरने १८ चेंडूत २१ धावा करणाऱ्या संजू सॅमसनला बाद करत ही जोडी फोडली.

त्यानंतर संजू सॅमसन बाद झाल्यानंतर शिवम दुबे आणि रियान पराग यांनी राजस्थानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शिवम दुबेने खराब चेंडूवर मोठे फटके मारुन धावगती चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी राजस्थानला ११ व्या षटकात ८१ धावांपर्यंत पोहचवले. यात शिवम दुबेचे ३२ धावांचे योगदान होते. शिवम दुबे आणि रियान पराग यांनी ६६ धावांची भागिदारी पूर्ण केली. पण, राजस्थानला १२ व्या षटकात शतकपार नेल्यानंतर ही जोडी फुटली. रियान पराग २५ धावा करुन बाद झाला. त्याला हर्षल पटेलने बाद केले.

शिवम दुबेने डावाची सुत्रे आपल्या हातात घेतली. त्याच्या जोडीला राहुल तेवतिया आला होता. त्याने आक्रमक फलंदाजी करत धावगती वाढवण्यास सुरुवात केली. शिवम दुबे अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता. पण, केन रिचर्डसनने त्याचे अर्धशतक पूर्ण होऊ दिले नाही. त्याने दुबेला ४६ धावांवर बाद केले. दुबे बाद झाल्यानंतर तेवतिया आणि मॉरिसने राजस्थानला १८ व्या षटकात १५० च्या पार पोहचवले. त्यानंतर तेवतियाने अखेरची काही षटके राहिली असताना फटकेबाजी करत राजस्थानला १७० धावांपर्यंत पोहचवले. पण , मोहम्मद सिराजने तेवतियाची २३ चेंडूत ४० धावांची खेळी १९ व्या षटकात संपवला. ही सिराजची तिसरी विकेट होती.

आता अखेरच्या षटकात मोठे फटके मारण्याची जबाबदारी ख्रिस मॉरिसवर आली होती. पण, हर्षल पटेलने मॉरिसला १० धावांवर बाद केले. पटेलने पाठोपाठ साकरियालाही बाद करत आपला तिसरा बळी टिपला. साकरिया बाद झाल्यानंतर श्रेयस गोपाळने षटकार मारत राजस्थानला १७७ धावांपर्यंत पोहचवले. पण, मोहम्मद सिराजने तेवतियाची २३ चेंडूत ४० धावांची खेळी १९ व्या षटकात संपवला. ही सिराजची तिसरी विकेट होती. आता अखेरच्या षटकात मोठे फटके मारण्याची जबाबदारी ख्रिस मॉरिसवर आली होती. पण, हर्षल पटेलने मॉरिसला १० धावांवर बाद केले. पटेलने पाठोपाठ साकरियालाही बाद करत आपला तिसरा बळी टिपला. साकरिया बाद झाल्यानंतर श्रेयस गोपाळने षटकार मारत राजस्थानला १७७ धावांपर्यंत पोहचवले. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर १ धाव घेत राजस्थानला २० षटकात १७७ धावांपर्यंत मजल मारुन दिली.

error: Content is protected !!