ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

अनिल देशमुख यांच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जाणत पाटील यांनी दिली प्रतिक्रिया

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात CBI’ने गुन्हा नोंद केला आहे. तसेच CBI’ने त्यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरी आणि कार्यालयावर सुद्धा छापे मारले आहेत. त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आता यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कारवाईवर भाष्य केले आहे.

म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केलं. याबाबतीत एकूण 4 जणांची चौकशी झाली, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली होती. उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’चे आदेश दिलेले असताना गुन्हा कसाकाय नोंद झाला असे जयंत पाटील यांनी सांगितले.

ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झालं, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचं अद्याप पर्यंत ऐकिवात नाही. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

error: Content is protected !!